घरCORONA UPDATECorona Cases In India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात ८ राज्यांमध्ये वाढला धोका!

Corona Cases In India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात ८ राज्यांमध्ये वाढला धोका!

Subscribe

संपूर्ण देशभरात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे देशात दुसरी लाट आली असून ही लाट प्रभावी आणि भीतीदायक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी २२ लाख पार झाला आहे. जागतिक कोरोनाच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर असून अमेरिका पहिल्या आणि ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. देशातील आठ राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये दररोज नव्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ८४.६१ टक्के इतक्या नव्या रुग्णांची नोंद या आठ राज्यांमध्ये होत आहे, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे. सध्या या आठ राज्यांमधील कोरोनाची परिस्थिती नेमकी काय आहे? ते पाहा…

- Advertisement -

देशातील आठ राज्यांमध्ये कोरोना धोका अधिक

महाराष्ट्र – बाधित संख्या – २८,१२,९८०, मृत्यूची संख्या – ५४,६४९, रिकव्हरी संख्या – २४,००,७२७, Active संख्या – ३,५६,२४३
छत्तीसगड – बाधित संख्या – ३,४९,१८७, मृत्यूची संख्या – ४,१७०, रिकव्हरी संख्या – ३,१९,४८८, Active संख्या -२५,५२९
कर्नाटक – बाधित संख्या – ९,९७,००४, मृत्यूची संख्या – १२,५६७, रिकव्हरी संख्या – ९,५६,१७०, Active संख्या – २८,२४८
पंजाब – बाधित संख्या – २,३९,७३४, मृत्यूची संख्या – ६,८६८, रिकव्हरी संख्या – २,०९,०३४, Active संख्या – २३,८३२
केरळ – बाधित संख्या – ११,२४,५८५, मृत्यूची संख्या – ४,६२२, रिकव्हरी संख्या – १०,९४,४०४, Active संख्या – २५,२४५
तामिळनाडू – बाधित संख्या – ८,८६,६७३, मृत्यूची संख्या – १२,७१९, रिकव्हरी संख्या – ८,५८,०७५, Active संख्या – १५,८७९
गुजरात – बाधित संख्या – ३,०७,६९८, मृत्यूची संख्या – ४,५१९, रिकव्हरी संख्या – २,९०,५६९, Active संख्या – १२,६१०
मध्य प्रदेश – बाधित संख्या – २,९५,५११, मृत्यूची संख्या – ३,९८६, रिकव्हरी संख्या – २,७४,४२९, Active संख्या – १७,०९६

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -