घरCORONA UPDATE'या' राज्यात शाळा सुरु होताच ८ शाळांमधील ८० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

‘या’ राज्यात शाळा सुरु होताच ८ शाळांमधील ८० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

Subscribe

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. मात्र, दिल्ली, हरियाणामध्ये कोरोनाचा कहर अद्याप सुरु आहे. दरम्यान, हरियाणा सरकारने २ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु केल्या होत्या. याचा परिणाम समोर आला असून ८ शाळांमधील तब्बल ८० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळेप्रशासन आणि राज्याच्या आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे. या शाळांना पुढील १५ दिवस बंद ठेवण्याची आणि शाळा सॅनिटाईज करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

हरियाणा सरकारने २ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरोग्य विभागाने दिवाळीपूर्वी काही सरकारी आणि खासगी शाळांमधील ८३७ विद्यार्थ्यांची कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल समोर आला आहे. हरियाणातील रेवाडीमध्ये ५ सरकारी शाळा आणि ३ खासगी शाळांमधील ८० विद्यार्थांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि राज्याच्या आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी कोरोनाबाधित सोपडल्याने उपायुक्त यशेंद्र सिंह यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश कुमार यांना आवश्यक पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाची लागण झालेले विद्यार्थी सापडलेल्या शाळा पुढील १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

- Advertisement -

दिवाळीनंतर महाराष्ट्रात शाळा उघडणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेऊन राज्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ नोव्हेंबरला दिले आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अप्पर मुख्य सचिव वंदना क्रिष्णा यांच्यासह अन्य अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर हे निर्देश देण्यात आले. शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जे मुल आजारी आहेत किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये’ असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -