Mulayam Singh Yadav birthday : मुलायम सिंह यादव यांच्या वाढदिवशी ८३ किलोचा ‘लाडू’ ठरतोय आकर्षण

lucknow 83 kg laddu became the attraction on Mulayam Singh Yadav birthday celebration in lucknow
Mulayam Singh Yadav birthday : मुलायम सिंह यादव यांच्या वाढदिवशी ८३ किलोचा 'लाडू' ठरतोय आकर्षण

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचा आज ( २२ सोमवारी) ८२ वा दिवस आहे. या वाढदिवसानिमित्त सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज कार्यकर्त्यांना प्रत्येक जिल्ह्यात भव्य कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र मुलायम सिंह यादव यांच्या वाढदिवशी यंदा ८३ किलोचा लाडू अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. राजधानी लखनऊमध्ये सपा मुख्यालयात वडील मुलायम यांच्या उपस्थितीत केक कापून अखिलेश यादव कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

तर दुसरीकडे शिवपाल सिंह यादव मुलायम यांच्या वाढदिवसानिमित्त सैफेईमध्ये केक कापणार आहेत. त्याचवेळी सपा पक्ष कार्यालयात मुलायम सिंह यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. मुलायमसिंह यादव यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते सपा मुख्यालयात पोहोचले आहेत.

अशातच समाजवादी व्यापारी सभा, महानगर वाराणसीचे अध्यक्ष रवि जयस्वाल आणि प्रदेश उपाध्यक्ष व पूर्वांचल प्रभारी प्रदीप जयस्वाल यांनी सपा कार्यकर्त्यांना मुलायम सिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त काशी विश्वनाथ दर्शनकर्त्यांना शुद्ध तुपातील ८३ किलोंचे लाडू वाटले आहेत. त्यामुळे मुलायम सिंह यादव यांच्या यंदाच्या वाढदिवशी ८३ किलोचा ‘लाडू’  आकर्षणाचा विषय ठरतोय.

शिवपाल यांनी ‘नेताजीं’ना दिल्या शुभेच्छा

शिवपाल सिंह यादव यांनीही मुलायम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुलायम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपाल आज सकाळी सैफईच्या चंदगीराम स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत. पण, या काळात अखिलेश लखनौमध्येच राहणार आहेत. लखनऊमध्ये अखिलेश केक कापून मुलायमसिंह यादव यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत.

२०१७ मध्ये काही विषयांवरून झालेल्या भांडणानंतर यादव कुळात फूट पडली होती. शिवपाल आणि अखिलेश वेगळे झाले होते. सुरुवातीला समाजवादी पक्षावर कब्जा घेण्यावरून भांडणं झाली. यावेळी शिवपाल यादव यांनी प्रगतीशील समाजवादी पार्टी (लोहिया) या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून अखिलेश आणि शिवपाल यांच्यात तेढ निर्माण झाली होती.

मुलायम यांचा शेतकरी कुटुंबात झाला जन्म

मुलायम सिंह यांचा जन्म इटावा जिल्ह्यातील सैफई गावातील शेतकरी कुटुंबात झाला आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलायम यांना पाच भाऊ आणि एक बहीण आहे. वडील सुधाकर सिंह यादव यांना मुलायम सिंह यांना कुस्तीपटू बनवायचे होते, परंतु मैनपुरी येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत त्यांचे राजकीय गुरू नाथुसिंह यांच्यावर कुस्तीचा प्रभाव पडला आणि त्यांनी नाथुसिंह यांच्या जसवंत नगर विधानसभा मतदारसंघातून राजकीय प्रवास सुरू केला. राजकारणात येण्यापूर्वी मुलायम यांनी काही दिवस इंटर कॉलेज पूर्ण करत होते. यावेळी त्यांना ‘भावी नेताजी’ या नावाने ओळखले जाऊ लागले.