राज्यात 24 तासांत 836 कोरोना रुग्णांची नोंद, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के

Corona virus

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात 24 तासांत 836 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के इतके आहे. आज दिवसभरात एकूण 1224 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यामध्ये आतापर्यंत 79,14,433 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज 2 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. राज्यात एकूण 11758 सक्रिय रुग्ण संख्या आहे. मुंबईत 5071 इतके रुग्ण असून पुण्यामध्ये 1914 सक्रिय रुग्ण आहेत.

सोमवारी मुंबईत 584 कोरोना रुग्णांची नोंद झाली. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 407 रुग्णांनी कोरोनावर मात केली होते.  तर मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,08,290 वर पोहोचली होती. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका होता.

देशात 24 तासांत 15 हजारहून अधिक रुग्ण

देशात गेल्या 24 तासांत 15 हजारहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात सध्या 1 लाख 11 हजार 252 एकूण कोरोनाबाधित असून त्यांच्या उपचार सुरु आहेत. सध्या 15,040 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. देशात सोमवारी दिवसभरात 8 हजार 813 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे


हेही वाचा : बिहारच्या महागठबंधन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, तेजस्वींना आरोग्य तर तेज प्रताप झाले वन आणि पर्यावरण मंत्री