घरअर्थजगतजानेवारी 2021 ते मार्च 2022 पर्यंत 42 भारतीय विमानतळावरील 84 कर्मचारी आढळले...

जानेवारी 2021 ते मार्च 2022 पर्यंत 42 भारतीय विमानतळावरील 84 कर्मचारी आढळले मद्यधुंद- DGCA

Subscribe

विमान वाहतूक नियामक DGCA च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2021 ते मार्च 2022 दरम्यान 42 भारतीय विमानतळावंर कर्तव्यावर असलेले एकूण 84 कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आढळले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) आकडेवारीनुसार, 84 कर्मचाऱ्यांपैकी 54 (64 टक्के) अल्कोहोल चाचणीत नशेत आढळून आले. दरम्यान अल्कोहोल चाचणीत अपयशी ठरलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना विमानतळ चालकांनी नियुक्त केले होते, तर काहींना विमानतळावर विविध विभागासाठी काम करणाऱ्या इतर कंपन्यांनी नियुक्त केले होते. DGCA डेटानुसार, जानेवारी 2021 ते मार्च 2022 दरम्यान अल्कोहोल चाचणीत फेल झालेल्या 84 कर्मचाऱ्यांपैकी 54 चालक (पायलट) होते.

डीजीसीएच्या आकडेवारीनुसार, भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) द्वारे संचालित 35 विमानतळांवर 56 कर्मचारी, अदानी समूहाद्वारे संचालित चार विमानतळांवर 17 कर्मचारी, जीएमआर समूहाद्वारे संचालित दोन विमानतळांवर नऊ आणि फेअरफॅक्स इंडियाद्वारे संचालित बेंगळुरू विमानतळावर दोन कर्मचारी जानेवारी 2021 ते मार्च 2022 दरम्यान अल्कोहोल चाचणीत फेल झाले.

- Advertisement -

तथापि, बंगळुरू विमानतळ ऑपरेटर बील यांनी स्पष्ट केले की, अल्कोहोल चाचणीत फेल झालेले दोन कर्मचारी त्यांचे कर्मचारी नाहीत. त्यांनी म्हटले की, “2021 मध्ये बेंगळुरू विमानतळावर (बीआयएएल) ब्रीद एनालाइजर चाचणीत या वर्षी आतापर्यंत कर्मचारी फेल झाल्याची कोणतीही घटना घडलेली नाही असे म्हटले आहे.

DGCA ला अल्कोहोल चाचण्यांमध्ये फेल झालेल्या 56 कर्मचाऱ्यांच्या आकडेवारीबद्दल विचारले असता, केंद्र-चालित AAI ने PTI सोबत शेअर केलेल्या डेटामध्ये सांगितले की, AAI द्वारे संचालित 14 विमानतळांवर जानेवारी 2021 ते मार्च 2022 पर्यंत केवळ 18 कर्मचारी अल्कोहोल चाचणीत फेल झाले आहेत. एएआयने सांगितले की, “बीए (ब्रेड एनालायझर) चाचणीत फेल झालेल्या 18 कर्मचाऱ्यांपैकी तीन एएआयचे होते आणि उर्वरित 15 एएआयसोबत करारावर काम करणाऱ्या एजन्सींचे होते.”

- Advertisement -

जानेवारी 2021 ते मार्च 2022 दरम्यान ज्या विमानतळावर सर्वाधिक नऊ कर्मचारी अल्कोहोल चाचणीत अपयशी ठरले ते मुंबई विमानतळ आहे, जे गेल्या वर्षी जुलैपासून अदानी समूहाच्या अंतर्गत आहे. जुलै 2021 पूर्वी, मुंबई विमानतळ GVK समूहाच्या नियंत्रणाखाली होते.

DGCA ने सप्टेंबर 2019 मध्ये विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांसाठी BA स्क्रिनिंगचे नियम जारी केले होते. नियमानुसार, संबंधित विमानतळ ऑपरेटरला केवळ त्याच्या कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर विमानतळावर काम करणाऱ्या इतर कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचीही नियमितपणे अल्कोहोल चाचणी करावी लागेल. नियमांनुसार, जर एखादा कर्मचारी अल्कोहोल चाचणीदरम्यान प्रथमच मद्यधुंद अवस्थेत आढळला किंवा चाचणी घेण्यास नकार दिला किंवा विमानतळ परिसर सोडून ते टाळण्याचा प्रयत्न केला, तर त्याला ‘ड्युटीवरून बडतर्फ केले जाईल आणि त्याचा परवाना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित केला जाईल.


RBI : रिझर्व्ह बँकेने ‘या’ सहकारी बँकेवर लादले निर्बंध; ग्राहकांकडून पैसे काढण्यावर मर्यादा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -