Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश येमेनमध्ये पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगरीचेंगरी; 85 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी

येमेनमध्ये पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगरीचेंगरी; 85 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी

Subscribe

येमेनची राजधानी साना येथे एका कार्यक्रमादरम्यान चेंगाराचेंगरी झाली, ज्यात 85 जणांचा मृत्यू झाला. यादरम्यान शेकडो लोक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

येमेनची राजधानी साना येथे एका कार्यक्रमादरम्यान चेंगाराचेंगरी झाली, ज्यात 85 जणांचा मृत्यू झाला. यादरम्यान शेकडो लोक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

येमेनची राजधानी साना येथे एका कार्यक्रमादरम्यान चेंगरचेंगरी झाली, ज्यात 85 जणांचा मृत्यू झाला. यादरम्यान शेकडो लोक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक या कार्यक्रमात व्यापारी लोकांना आर्थिक मदत करत होते. या घटनेनंतर कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या दोन व्यावसायिकांमना हुथी बंडखोरांनी ताब्यात घेतलं आहे. ( 85 killed and hundreds injured in Yemen cash distribution program )

- Advertisement -

स्थानिक मीडिया वृत्तानुसार, मृतांमध्ये मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

( हेही वाचा: ‘…तर मी राजीनामा देईन’; अमित शाहांना फोन केल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी फेटाळला )

- Advertisement -

एका कार्यक्रमात साहित्याचे वाटप सुरु असताना हे घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली आणि चेंगराचेंगरी झाली. हुथी-समर्थित सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही मोठी दुर्घटना पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवसांत घडली आहे. काही व्यापारी देणगी स्वरुपात साहित्याचे वितरण करत होते. त्यावेळी ही अत्यंत दु:खद घटना घडली आहे.

व्यापारी ईदपूर्वी गरिबांना आर्थिक मदत करत होते. त्यावेळी मोठी गर्दी जमली. चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्यानंतर मदत आणि बचाव कार्य तत्काळ सुरु करण्यात आलं. यावेळी मदत करणाऱ्या दोन प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शेकडो लोक यावेळी देणगी गोळा करण्यासाठी जमले होते. प्रत्येकाला 5 हजार येमेनी रियाल किंवा सुमारे 9 अमेरिकन डाॅलर मिळणार होते. मात्र, यादरम्यान चेंगराटेंगरी झाली.

दरम्यान, येमेनच्या अंतर्गत मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, देणगीचा हा कार्यक्रम दोन व्यावसायिकांनी आयोजित केला होता. त्यांना या दुर्घटनेप्रकरणी जबाबदार धरण्यात आलं असून या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. चेंगराचेंगरीची कारणे शोधली जात आहेत.

- Advertisment -