घरCORONA UPDATECoronavirus: गुजरातमध्ये करोनाचा दुसरा बळी; भारतातील मृत्यूची संख्या १२ वर

Coronavirus: गुजरातमध्ये करोनाचा दुसरा बळी; भारतातील मृत्यूची संख्या १२ वर

Subscribe

गुजरातमधील कोरोनाग्रस्त रुग्णाचा हा दुसरा मृत्यु आहे.

देशात करोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणीक वाढत असून देशातील मृतांची संख्येतही वाढ झाली आहे. अहमदाबादमधील ८५ वर्षीय महिलेचा बुधवारी करोनाने मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती गुजरातच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मृत महिला अनेक आजारांनी ग्रस्त होती, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. यामुळे देशातील करोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. गुजरातमधील कोरोनाग्रस्त रुग्णाचा हा दुसरा मृत्यु आहे. दोन दिवसांपूर्वीच एका ६९ वर्षीय वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला होता. देशात करोनाचे सहाशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. दिसभरातील करोनाचा हो तीसरा बळी आहे. मध्य प्रदेश आणि तामिळनाडू येथे आणखी दोन मृत्यूची नोंद झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशाला लॉकडाऊन करण्यात आले आहे. देशभरातील नागरिकांमध्ये करोनाबद्दल गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, २१ दिवस बंद असल्याने किराणा मालाच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड पाहायला मिळाली. लोकांना वारंवार सांगूनही लोक घराबाहेर पडून धोका पत्करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -