घरदेश-विदेश९ वर्षांचा चिमुकला भगतसिंगांच्या भूमिकेत, फासावर जाण्याची तालीम सुरु झाली अन्...

९ वर्षांचा चिमुकला भगतसिंगांच्या भूमिकेत, फासावर जाण्याची तालीम सुरु झाली अन्…

Subscribe

उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सराव करणाऱ्या मुलाचा तालमीदरम्यान मृत्यू झाला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साधारण ९ ते १० वर्षांचा मुलगा देशभक्तीपर कार्यक्रमात शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारणार होता. यासाठी तो तालीम करत होता. मात्र तालमीदरम्यान फाशीचा फास अचानक त्याच्या गळ्याभोवती अडकला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

असा घडला प्रकार

असे सांगितले जात आहे की, ९ वर्षीय शिवम भगतसिंगची भूमिका करत होता. शिवम फाशीच्या भागाची तालीम करण्यासाठी स्टूलवर चढला होता. त्याने गळ्याभोवती फास घातल्याबरोबर अचानक खाली ठेवलेल्या स्टूलवरून त्याचा पाय घसरला. ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती फास घट्ट बसला. त्यावेळी तिथे असलेली मुले त्याला मदत करू शकली नाहीत. दरम्यान या घटनेत शिवमचा मृत्यू झाला. या घडलेल्या दुर्देवी घटनेनंतर शिवमच्या घरच्यांनी कोणाविरुद्ध तक्रार न करता आपल्या मुलावर अंत्यसंस्कार केले.

- Advertisement -

घडलेल्या घटनेमुळे उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये दुखाःचा डोंगर कोसळला आहे. गुरुवारी दुपारी ९-१० वर्षीय शिवम काही मुलांसोबत खेळत होता. त्याच्यासोबत गावातील प्राथमिक शाळेतील मुलेदेखील होती. या सर्व मुलांनी १५ ऑगस्टसाठी नाटकाचा सराव सुरू केला. यादरम्यान शिवमने भगतसिंगची भूमिका साकरली होती. शिवमने खाटेवर चढून फाशीचा दोर वर बांधला. त्याने मुलांना सांगितले की मी भगतसिंग सारखा फासावर लटकेल. त्याने गळ्यात दोर घालताच त्याच्या पायाखालून स्टूल सरकला आणि त्याच्या गळ्याभोवती फास बसला ज्यामुळे त्याचा जीव गुदमरला आणि त्याच्या जीव गेला. या घटनेनंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. यानंतर शिवमच्या पालकांना तेथे बोलावून संपूर्ण घटना सांगितली.


केंद्र सरकारची मदत तुटपुंजी, राज्याला भरीव मदत करण्याची एकनाथ शिदेंची मागणी

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -