घरदेश-विदेशप्रेमासाठी कायपण, १९ वर्षाच्या तरुणीचा ६७ वर्षाच्या आजोबांवर जडला जीव, प्रकरण कोर्टात

प्रेमासाठी कायपण, १९ वर्षाच्या तरुणीचा ६७ वर्षाच्या आजोबांवर जडला जीव, प्रकरण कोर्टात

Subscribe

 

असे म्हणतात प्रेमाला वयाचे बंधन नसते.  असाच काहीसा किस्सा हरियाणामध्ये घडला आहे. एका 19 वर्षीय तरुणीचा 67 वर्षीय आजोंबावर जीव जडला आहे. इतकचं नाही तर त्यांनी लग्न देखील केल्याची माहिती समोर आली आहे. पण या दोघांना आता त्यांच्या घरच्यांची भीती वाटत आहे. घरच्यांचा विरोध होणार या भीतीपोटी दोघांनी कोर्टात धाव घेतली आहे. सध्या त्यांची याचिका पंजाब व हरियाणा हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेत कोर्टाने देखील तत्काळ आदेश जाहीर करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

संपुर्ण प्रकरणाचं सखोल तपास करण्याचे आदेश देत हायकोर्टाने महिला पोलिसांचा समावेश करत एक टिम तयार केली आहे. आणि या अंतर्गत मुलीला सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे, तसेच ज्या माणसाची तिने विवाह केला आहे त्याबात संपुर्ण माहिती शोधण्यास सांगितली आहे. 65 वर्षीय व्यक्तीन यापुर्वी देखील विवाह केला आहे का? तसेच त्याचा पुर्वीचा इतिहास काय आहे? मुलीवर लग्न करण्यासाठी कोणता दबाव देण्यात आला आहे का? या संबधीत विस्तृत माहिती कोर्टात मांडण्याचे आदेश देण्यात आले आहे.

हायकोर्टात देण्यात आलेल्या आधार कार्डवर त्या माणसाची जन्मतारीख 1 जानेवारी 1953 अशी आहे. तसेच लग्न झालेल्या तरुणीची जन्मतारीख 1 डिसेंबर 2001 आहे. विवाहित व्यक्ती हा शेतता काम करतो.तसेच महिना 15000 रुपये त्याची मिळकत असल्याचे कळतेय. मुलीच्या माहेरकडील मंडळीने या विवाहावर आक्षेप नोंदवला होता. तसेच त्यांनी पोलिस तक्रार दाखल केली होती पण याचा काहीच उपयोग झाल नाही.

- Advertisement -

हे हि वाचा –ट्विटर ‘पनौती’ टॉप ट्रेंडिंगला, व्हायरल भन्नाट मिम्सचे कारण वाचा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -