घरताज्या घडामोडीतामिळनाडूत 9 वर्षीय 'इन्स्टा क्वीन'ची गळफास लावून आत्महत्या

तामिळनाडूत 9 वर्षीय ‘इन्स्टा क्वीन’ची गळफास लावून आत्महत्या

Subscribe

एका 9 वर्षीय मुलीने किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील पेरियाकुप्पम येथे घडली. प्रतिक्षा असे या 9 वर्षीय मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

एका 9 वर्षीय मुलीने किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील पेरियाकुप्पम येथे घडली. प्रतिक्षा असे या 9 वर्षीय मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या नऊ वर्षांच्या मुलीला तिचे शेजारी ‘इन्स्टा क्वीन’ म्हणत होते. (9 year old Insta Queen dies by suicide in Tamil Nadu after father asked her to study)

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील पेरियाकुप्पम येथे राहणाऱ्या प्रतीक्षाला तिच्या वडिलांनी अभ्यास करण्यास सांगितले. कृष्णमूर्ती असे प्रतिक्षाच्या वडिलांचे नाव आहे. वडील कृष्णमूर्ती यांनी मुलीला सासरच्या घराजवळ खेळताना पाहून घरी जाऊन अभ्यास करण्यास सांगून घराच्या चाव्या दिल्या. यानंतर ते दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी बाहेर गेले. त्यानंतर ते घरी परतले असता त्यांना घर आतून कुलूप असल्याचे पाहून त्यांनी त्यांच्या मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितले.

- Advertisement -

मात्र प्रतिक्षाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घाबरलेल्या वडिलांनी घराची मागची खिडकी तोडली. त्यावेळी त्यांना प्रतिक्षाच्या गळ्यात टॉवेल लटकवल्याचे दिसले. त्यानंतर तातडीने प्रतिक्षाला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना रात्री 8.15 वाजताच्या सुमारास घडल्याचे समजते.

मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

- Advertisement -

पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधील एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अदिती दलभंजन (20) असे या विद्यार्थीनीचे नाव असून तिने ससून रुग्णालयाच्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केली. या घटनेनंतर ससून रुग्णालय आणि आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा – वडील मुलीला कॉलेजमध्ये सोडायला गेले ती शेवटची भेट ठरली, मेडिकलच्या विद्यार्थीनीने ‘असे’ संपवले जीवन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -