#NaakamiKe9Saal : मोदी सरकारच्या अपयशाची ९ वर्ष, काँग्रेसने सुरु केले सोशल मीडियावर आंदोलन

केंद्रात मोदी सरकारला आज ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मागील ९ वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी जनतेसाठी काय केले, असे प्रश्न सध्या काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येत आहेत. यावेळी काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल. असं आश्वासनं खुद्द पंतप्रधान मोदींनी दिले होते. परंतु हे आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाहीत. त्यांच्या अपयशाची गोष्ट खूप मोठी आहे, असं ट्वीट करत काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

२०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचे आश्वासन, काळा पैसा परत आणून १५ लाख देण्याचे आश्वासन, २ कोटींचे आश्वासन आणि दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचं आवाहन देण्यात आलं होतं. परंतु आता या गोष्टीला बरेच दिवस निघून गेले आहेत, असंही ट्वीट काँग्रेसने केलं आहे.

 पीएम किसान सन्मान निधी योजना

२०१४ मध्ये मोदींनी पहिल्यांदा केंद्राची सूत्र हाती घेतली. २०१९ ची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी म्हणजेच २४ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांनी शेतकऱ्यांना आकर्षित करणारी अशी पीएम किसान सन्मान निधी योजना जाहीर केली. शेतकर्‍यांना फायदा होणे, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेनुसार प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा करण्यात येतात. दोन-दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.


हेही वाचा : नवीन संसदेच्या उद्घाटनप्रकरणी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली