घरदेश-विदेशदेशातील लसीकरणाचा आकडा 90 कोटी पार

देशातील लसीकरणाचा आकडा 90 कोटी पार

Subscribe

कोरोनाविरूद्धच्या लढाईतील देशाने ९० कोटींचा पल्ला पार केला आहे. केंद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी यासंबंधीचे ट्विट केले आहे.

देशात आतापर्यंत ९० कोटी २६ लाख ७५ हजार १७८ कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत ६५ कोटी ७८ लाख ३५ हजार ६८३ जणांना लसीचा पहिला डोस तर २४ कोटी ४८ लाख ३९ हजार ४९५ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये देशातील सर्वाधिक लसीकरण झाले. लसीकरणात दुसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये १० कोटी ९१ लाख ४ हजार ६४८ कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात ८ कोटी ३३ लाख ६४ हजार ३२६ कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले. मध्य प्रदेशमध्ये ६ कोटी ३८ लाख ८२ हजार ४९२, तर गुजरातमध्ये ६ कोटी १३ लाख ६५ हजार ८६५ कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची 24 हजार 354 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. या कालावधीत 234 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन कोरोना रूग्ण मिळाल्यानंतर आता देशातील संक्रमित लोकांची एकूण संख्या 3 कोटी 37 लाख 91 हजार 61 वर गेली आहे. देशात आतापर्यंत 2 लाख 73 हजार 889 सक्रिय प्रकरणे झाली आहेत. तर 3 कोटी 30 लाख 68 हजार 599 लोक बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे आतापर्यंत 4 लाख 48 हजार 573 लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -