घरदेश-विदेशधक्कादायक! चीनमध्ये कोरोनामुक्त झालेल्या ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम

धक्कादायक! चीनमध्ये कोरोनामुक्त झालेल्या ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम

Subscribe

कोरोनामुळे ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसाला गंभीर नुकसान झाले असून पाच टक्के रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात आले.

कोरोनाचं केंद्रबिंदू म्हणून चीनला ओळखलं जाणाऱ्या चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले. मात्र याच चीनमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली तेथे संक्रमित लोकांच्या फुफ्फुसांवर कोरोना विषाणूचा मोठा परिणाम झाल्याचे समोर येत आहे. काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एकदा कोरोना संसर्गामधून पुर्णपणे बऱ्या झालेल्या व्यक्तींना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे.

कोरोनावर मात करणाऱ्या १०० रुग्णांच्या चाचण्या

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसाला गंभीर नुकसान झाले असून पाच टक्के रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात आले. तर वुहान विद्यापिठाच्या झोंगनन रुग्णालयातील तज्ज्ञ पेंग झियोंग यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने एप्रिल महिन्यापासून कोरोनावर मात करणाऱ्या १०० रुग्णांच्या चाचण्या केल्या त्यानंतर हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दरम्यान, वुहानमधील एका प्रमुख रुग्णालयाने त्यांच्याकडे उपचार घेऊन कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या या चाचण्या करण्यात आल्या असल्याचे सांगितले.

- Advertisement -

९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांना नुकसान

चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेल्या चाचणीमध्ये ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांना मोठे नुकसान झालं असल्याचे समोर आले आहेत. तर जुलैमध्ये या चाचण्यासंदर्भातील मोहिमेतील पहिला टप्पा संपला असून पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांचे सरासरी वय हे ५९ वर्षे इतके होते.


चीनमध्ये नव्या व्हायरसचा फैलाव! ६० जणं गंभीर आजारी तर ७ बळी!


पेंग यांच्या नेतृत्वाखालील गटाने रुग्णांवर अनेक प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, यामध्ये असं दिसून आलं की कोरोनावर मात केलेले रुग्ण सहा मिनिटांमध्ये ४०० मीटर चालू शकतात. तर चांगली व्यक्ती याच कालावधीत ५०० मीटरचे अंतर कापते. तर रुग्णालयामधून घरी सोडण्यात आलेल्या काही रुग्णांना तीन महिन्यानंतरही ऑक्सीजनशी संबंधित अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -