घरदेश-विदेश९० वर्षांच्या आजीबाईंवर बलात्कार करुन केला खुन

९० वर्षांच्या आजीबाईंवर बलात्कार करुन केला खुन

Subscribe

पोलीस या शंकरचा शोध घेत आहेत. दरम्यान या वृद्ध महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नळगोंड्याच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

तेलंगणा येथील अनुमुला गावात अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे. एका ९० वर्षीय आजीबाईंवर २२ वर्षीय नराधमाने बलात्कार केला आहे. त्यानंतर आपण पकडले जाऊ या भितीपोटी नराधमाने तीचा खुन केला. तेलंगणातल्या अनुमुला या गावात ९० वर्षांच्या आजीबाई घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या मुलाचे घर शेजारीच होते. मुलगा आणि त्यांची सून त्यांची देखभाल करत होते. रविवारच्या सकाळी त्यांची सून त्यांना चहा देण्यासाठी घरी गेली असता त्यांचा मृतदेह दिसला. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.

दरम्यान, पोलिसांना ९० वर्षीय आजीबाईंच्या शरीरावर दात आणि नखांच्या जखमा दिसल्या. मृत्यूपूर्वी आजीबाईंवर बलात्कार झाल्याचे निष्पण होत आहे. या आजींच्या मुलाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताना सत्रसाला शंकर या २२ वर्षीय तरुणावर संशय व्यक्त केला आहे. सत्रसाला शंकर हा आईच्या घराजवळ दारूच्या नशेत फिरताना आढळला होता, असे या तक्रारीत नमुद केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जात पडताळणीसाठी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार


शंकर हा तिथे हमाल म्हणून काम करतो. याआधी त्याच्याविरोधात स्त्रियांशी असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारी केल्या गेल्या आहेत. गावातल्या अनेक स्त्रियांना त्याने छेडले होते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शंकर फरार असून पोलिस शंकरचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -