घरCORONA UPDATEदेशभरात ९००० तबलीगी जमातीचे लोकं क्वारनटाईनमध्ये

देशभरात ९००० तबलीगी जमातीचे लोकं क्वारनटाईनमध्ये

Subscribe

लॉकडाऊनचा आदेश धुडकावत दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या ९००० कार्यकर्ते व त्यांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटली आहे. त्यांना क्वारनटाईनमध्ये ठेवण्यात आले असून त्यात १३०६ परदेशी नागरिक असून उर्वरित भारतीय नागरिक आहेत. अशी माहिती गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली.

गुरुवारी आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशभरात कोरोना व्हायरसचा सामना करण्याबरोबरच लॉकडाऊनवर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी मुंबईतील धारावीत कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण सापडल्याने परिसर सील करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच संबंधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचीही तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. कालपासून ३२८ नवीन केसेस समोर आल्या असून १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर १९६५ जणांना कोरोनाची लागण झाली असून देशात कोरोनामुळे ५० जणांचा मृत्यू झाला आणि १५० लोक कोरोनामुक्त झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

तसेच दिल्लीत तबलीगी जमातीमधील २, ००० लोकांपैकी १, ८०४ जणांना क्वारनटाईन करण्यात आले तर ३३४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. या जमातीमधील ४०० जणांना कोवी १९ ची लागण झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -