Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश इंजेक्शन नाही, ऑक्सिजन नाही, नाचत गात आजोबांनी केली कोरोनावर मात

इंजेक्शन नाही, ऑक्सिजन नाही, नाचत गात आजोबांनी केली कोरोनावर मात

Related Story

- Advertisement -

देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला आहे. कोरोनाचा संसर्ग कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होत आहे. यामुळे सर्वांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. मात्र, देशात अशी पण काही उदाहरणं आहेत, जी वय अधिक असून देखील कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. मध्य प्रदेशमधील बालाघाट येथे राहणारे तुलसीराम सेठिया यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी कोरोनाला घरच्या घरी हरवल्याचं समोर आलं आहे. कोणतंही इंजेक्शन नाही किंवा ऑक्सिजन नाही, केवळ नाचत गात या आजोबांनी कोरोनाला हरवलं आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर, तुळशीराम सेठिया यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आलं. क्वारंटाईन काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात संगीत ऐकलं. गाणी लावत, त्या गाण्यांवर ठेका धरत आजोबांनी कोरोनावर मात केली. तुळशीराम सेठिया यांना जेव्हा कोरोनाची लागण झाल्याचं समजलं तेव्हा कुटुंबाला धक्का बसला. कुटुंबाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवलं. मात्र, त्यांनी नकार देत घरीच राहण्यावर ठाम राहिले. घरी क्वारंटाईन करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. या काळात त्यांच्या ऑक्सिजन लेव्हलवर लक्ष ठेवण्यात आलं. घरातील मुलांनी सतत गाणी लावून ठेवली. सेठिया हे या गाण्यांवर ताल धरत नाचत होते. याचा व्हिडिओ देखील परिवाराने केला. त्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला.

- Advertisement -

दरम्यान, आता ९२ वर्षांच्या तुलसीराम सेठिया यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तुलसीराम सेठिया यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना मला १०० वर्ष जगायचं आहे, असं म्हटलं. कोरोनाची लागण झाल्याची मी अजिबात चिंता केली नाही. मी माझ्या आवडीचं जेवण, जेवढं शक्य होतं तेवढी कसरत करत कोरोनाला हरवलं, असं ९२ वर्षांच्या तुलसीराम सेठिया यांनी सांगितलं.

 

- Advertisement -