Corona Update: देशात २४ तासांत १,१३३ रुग्णांचा मृत्यू, कोरोनाग्रस्तांची संख्या ५४ लाख पार!

92,605 Covid-19 cases and 1,133 deaths, India’s tally over 5.4 million
Corona Update: देशात २४ तासांत १,१३३ रुग्णांचा मृत्यू, कोरोनाग्रस्तांची संख्या ५४ लाख पार!

देशात कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोनाबाधित रुग्ण रिकव्हर होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगातील कोरोनाच्या यादी भारत जरी कोरोनाबाधित संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी कोरोनामुक्त होण्याच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने कोरोनामुक्त होण्याच्या संख्येत अमेरिकेला देखील मागे टाकले आहे. गेल्या २४ तासांत देशात ९२ हजार ६०५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार १३३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५४ लाख ६२०वर पोहोचली आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ८६ हजार ७५२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४३ लाख ३ हजार ४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १० लाख १० हजार ८२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणीवर अधिक भर दिला जात आहे. देशात आतापर्यंत ६ कोटी ३६ लाख ६१ हजार ६० कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी १२ लाख ६ हजार ८०६ कोरोना चाचण्या शनिवारी दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)ने दिली आहे.


हेही वाचा – केंद्र सरकारवर प्रथमच १०१.३ लाख कोटींचे कर्ज