घरताज्या घडामोडीAir Pollution : 93 टक्के भारतीयांचं आरोग्य धोक्यात, रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Air Pollution : 93 टक्के भारतीयांचं आरोग्य धोक्यात, रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Subscribe

प्रदूषण वाढत असताना आता ९३ टक्के भारतीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भारतातील ९३ टक्के लोक खतरनाक पीएम २.५मध्ये क्षेत्रात आहेत.

हिवाळ्याच्या दिवसात दिल्ली एनसीआरमध्ये धुक्याची चादर पसरल्यासारखी वाटते पण प्रत्यक्षात ती दूषित हवा असते. दिल्लीतील प्रदूषण मागच्या काही दिवसात प्रचंड वाढले आहे. प्रदूषण वाढत असताना आता ९३ टक्के भारतीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भारतातील ९३ टक्के लोक खतरनाक पीएम २.५मध्ये क्षेत्रात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनी मागील वर्षी जाहीर केलेल्या नवीन हवेच्या गुणवत्ता मानकांपेक्षा ही गुणवत्ता फार वाईट असल्याचे निदर्शनास आले आहे.

वायू प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुर्मान १.५ वर्षांनी कमी झाले असल्याचे नवीन जागतिक अहवालात म्हटले आहे. देशातील कर्करोग्यांच्या आयुर्मानात देखील १.३९ वर्षांनी घट झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मागील वर्षी हवेच्या गुणवत्तेची मानके अधिक घट्ट केली होती. वार्षिक सरासरी MP २.५ एक्सपोजर पातळी १० mg\cu m पूर्वीच्या पातळीपासून ५ मायक्रोग्राम प्रति घनमीटरपर्यंत कमी करण्यात आली होती.

- Advertisement -

प्रदूषण वाढल्यानंतर पीएम २.५ आणि पीएम १० ची चर्चा सुरू होते. मात्र याचा नेकमा अर्थ काय असा प्रश्न पडतो. या दोन गोष्टी वाढल्यामुळे हवेचा दर्जा कसा खालावतो जाणून घ्या.

PM 2.5 आणि PM 10 म्हणजे काय ?

- Advertisement -

सेंट्रल फॉर सायन्स एँड एनव्हायरमेंटचे विवेक चट्टोपाध्याय यांनी म्हटले आहे की, पीएम म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर ज्यात हवेतील सूक्ष्म कण मोजले जातात. २.५ आणि १० हवेतील कणांचा आकार दर्शवतात. म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर आकृती जितकी कमी असेल तितके हवेतील कण कमी असतील.

PM 2.5ची पातळी ही धुराच्या तुलनेत जास्त वाढते. वातावणात काही गोष्टी आपण जाळल्यास ही पातळी वाढते. यात हवेतील २.५ मायक्रोमीटर पेक्षा लहान असतात. तर पीएम १० म्हणजेच हवेतील कण १० मायक्रोमीटरपेक्षाही लहान असतात. तेव्हा पीएम १० पीएम २.५ पातळी १०० च्या वर पोहोचते तेव्हा हवेतील धूळ, माती, कण जास्त प्रमाणात असताता आणि हे वाईट क्षेणीचे लक्षण दर्शवतात. ते कण आपल्या श्वासाद्वारे फुफ्फुसात सहजपणे पोहोचू शकतात.


हेही वाचा – Operation Ganga: युक्रेनमध्ये अडकलेल्या 600 भारतीयांची एका रात्रीत सुटका; पुढील दोन दिवसात 7 हजार भारतीयांना मायदेशी आणणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -