घरताज्या घडामोडीरणवीरच्या गाण्यावर ९३ वर्षाच्या आजीने धरला ठेका!

रणवीरच्या गाण्यावर ९३ वर्षाच्या आजीने धरला ठेका!

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सारा अली खान यांच्या ‘आंख मारे’ या गाण्यावर तब्बल ९३ वर्षाच्या आजीने ठेका धरला आहे. आजीच्या या भन्नाट डान्समुळे आजीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. या आजीने ‘आंख मारे’ या गाण्यावर धमाकेदार डान्स केला असून आजीचा डान्स पाहून कुटुंबातील सदस्यांनी देखील आजीचा उत्साह वाढवल्याचे दिसून येत आहे. आजीचा हा भन्नाट डान्स पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

वाढदिवसाच्या पार्टीला आजीने केला डान्स

कोलकतामधील गौरव साहा यांनी आपल्या ९३ वर्षाच्या आजीचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला डान्स, गाणी सुरु होती. त्याच दरम्यान ‘आंख मारे’ हे गाणे लावण्यात आले आणि त्या गाण्यावर आजीने भन्नाट डान्स केला. आजी नाचते पाहून कुटुंबातील सर्वच जण आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी आजीचा व्हिडीओ काढला.

- Advertisement -

दरम्यान, गौरव साहा यांनी हा व्हिडीओ आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना इतका आवडला की फेसबुकवरुन थेट ट्विटर, युट्बूब, इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होऊ लागला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तब्बल १२ लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.

- Advertisement -

‘सिंबा’ या चित्रपटातील ‘आंख मारे’ हे गाणे चांगलेच लोकप्रिय असून हे गाणे लग्न, पार्टी, तसेच कुठल्याही समारंभात आवडीने वाजवले जाते. या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.


हेही वाचा – खोदकाम करणाऱ्या मजुराचे नशीब फळफळले; खाणीत सापडला कोट्यवधीचा हिरा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -