Coronavirus: कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट; ९९ टक्के कुंभा रिटर्न्स कोरोनाबाधित

99% 'Kumbh returnees' test positive for COVID-19 Madhya Pradesh
Coronavirus: कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट; ९९ टक्के कुंभा रिटर्न्स कोरोनाबाधित

देशात कोरोना दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसाला साडे तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. काल शनिवारी देशात ४ लाखांचा विक्रम कोरोनाबाधितांचा आकडा नोंदवला गेला. त्यामुळे सध्या कोरोनाच्या या भयानक संकटावर मात करण्यासाठी अनेक स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. पण दुसऱ्या बाजूला नुकताच पार पडलेल्या कुंभमेळ्याविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. हरिद्वारे कुंभमेळ्याला उपस्थितीत असलेल्या ९९ टक्के कुंभा रिटर्न्सचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान हरिद्वारेमधील कुंभमेळ्या कोरोनाचा सुपड स्प्रेडर असून ६१ रिटर्न्सपैकी ६० तीर्थयात्रियांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. टाईम्स नाउच्या माहितीनुसार, हे सर्व रिटर्न्स कुंभ मेळातील नसूनही शकतात, ही संख्या भिन्न असू शकते. तसेच हे लोकं कुंभ मेळ्यातून परतले आहेत, हे तपासणे देखील कठीण आहे.

जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळ्यांपैक एक कुंभमेळा आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हा सोहळा पार पडतो. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी कुंभमेळ्यातून परलेल्यांसाठी कोविड चाचणी आणि क्वारंटाईन होण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्लीमध्ये कुंभमेळ्यातून परतलेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन अनिवार्य केले आहे. तसेच दिल्ली सरकारने कुंभमेळ्यातून परलेल्यांपैकी जे लोकं कोणतीही माहिती न देता प्रवास करतात, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इतर राज्यांपैकी गुजरातने कुंभमेळ्यात परत येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती. कारण भक्तांना इच्छेनुसार सामाजिक भेदभावाच्या नियमांचे उल्लंघन करतांना पाहिले जाऊ शकते.

शनिवारी मध्य प्रदेशमध्ये १२ हजार ३७९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १०२ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच १४ हजार ६२ जण कोरोनामुक्त झाले होते. आता मध्य प्रदेशमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाख ७५ हजार ७०६वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ८१ हजार ४७७ कोरोनामुक्त झाले असून ५ हजार ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा –Covaxin vs Covishield : कोव्हिशील्डपेक्षा कोवॅक्सिन लस वेगळी का आहे? जाणून घेऊ साइड इफेक्ट्स आणि वैशिष्ट्ये