घरCORONA UPDATEVideo: सलाम! ९९ वर्षीय आजी मजुरांसाठी तयार करतायत फुड पॅकेट

Video: सलाम! ९९ वर्षीय आजी मजुरांसाठी तयार करतायत फुड पॅकेट

Subscribe

देशात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लवकरच लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू होईल. त्यामुळे हातावर पोटअसणाऱ्यांनी गावची वाट धरली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांची नोकरी गेली आहे. त्यामुळे या लोकांच्या मदतीला अनेकजण धावून आले आहेत. सेलेब्रेटी, राजकारणी यांनी मदतीचा हात पुढे केलाच पण सर्वसामान्यही आपल्या जमेल तशी मदत करत आहेत. काही दिवसांपूर्वी अवघ्या एक रुपयात इडली विक्री करणाऱ्या ८२ वर्षाच्या कमलथल आजीबाबत आपण वाचली. त्यानंतर तमीळनाडूमध्ये मोफत इडली विकणाऱ्या आजींचही कौतुक झालं. आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक ९९ वर्षांच्या आजीबाई मजूरांसाठी जेवण पॅक करताना दिसत आहेत. या आजीबाई मुंबईच्या असल्याच म्हटलं जात आहे. हा व्हिडिओ कराचीतील वकील झाहीद इब्राहीमने पोस्ट केला आहे. वकिल यांनी दिलेल्या कॅप्शनवरून या आजीबाई त्यांच्या आत्या असल्याचं समजत आहे. व्हिडिओत आजीबाई पोळी, चटणी आणि ठेचा पॅक करताना दिसत आहेत.

- Advertisement -

हा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी आजींचे आभार मानले आहेत.

- Advertisement -


हे ही वाचा – जबरदस्त ऑफर! BSNL ग्राहकांना तब्बल ४ महिने देणार मोफत सेवा!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -