दिल्लीत आणखी एक निर्दयी घटना; मैत्री तोडल्याने मैत्रिणीवर केले चाकूने सपासप वार

a 22 year old youth arrested for stabbing girl in adarsh nagar of delhi

देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा एक निर्दयी घटना समोर आली आहे. एका किरकोळ कारणावरून तरुणाने एका तरुणीवर चाकूने सपासप वार केले आहेत. ज्यात संबंधित तरुणी गंभीररित्या जखमी झाली आहे. दिल्लीच्या आदर्श नगरमध्ये ही घटना घडली आहे.

दिल्लीच्या आदर्शनगरमध्ये एका तरुणाने मैत्री तोडल्याच्या रागातून आपल्या मैत्रिणीवर चाकूने वार केले आहे. यात तरुणीच्या मानेवर, पाटोवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. पीडितेला बाबू जनजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पीडितेवर वरिष्ठ डॉक्टरांच्या निगरानीखाली उपचार सुरु आहेत.

२१ वर्षीय पीडित तरुणी तिच्या कुटुंबासह दिल्लीतील पार्क एक्स्टेंशन भागात राहते. ती डीयूच्या एसओएलमधून बीए करत आहे. पीडित तरुणी आणि आरोपी सुखविंदर यांच्यात पाच वर्षांपूर्वी मैत्री झाली होती. मात्र पीडितेच्या कुटुंबियांना आरोपीसोबतची तिची मैत्री पसंत नव्हती, त्यामुळे पीडितेने त्याच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली, ती आरोपीशी बोलत नव्हती.

याबाबत पीडितेने सांगितले की, ती सोमवारी दुपारी कार ड्रायव्हिंग शिकण्यासाठी घरातून निघाली होती. यावेळी आरोपीने पीडितेला भेटण्याच्या बहाण्याने बोलावले, दोघे बोलत रस्त्यावरून जात होते. याचवेळी आरोपीने पीडितेला तिच्यासोबत मैत्री तोडण्याचे कारण विचारले. ज्यानंतर त्याने रागात पीडितेच्या मानेवर, पोटावर, हातावर अनेक वार केले.

ही घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी पीडितेचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तिला बाबू जगजीवन राम रुग्णालयात दाखल केले, पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर आरोपी दिल्लीहून अंबाला येथे पळून गेला होता. पोलिसांच्या पथकाने अंबाला गाठून ३ जानेवारीला त्याला अंबाला येथून अटक केली आहे.


ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा माधव भांडारी यांचे निधन; वयाच्या ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास