Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशPakistan News : ऐकावे ते नवलंच! हजारो लोकांना मेजवानी देण्यासाठी भिकाऱ्याने खर्च...

Pakistan News : ऐकावे ते नवलंच! हजारो लोकांना मेजवानी देण्यासाठी भिकाऱ्याने खर्च केले 1.25 कोटी

Subscribe

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. तर दुसरीकडे आर्थिक संकट आणि महागाईमुळे सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेचे जगणेही कठीण झाले आहे. असे असतानाही पाकिस्तानमधील  एका भिकारी कुटुंबाने हजारो लोकांसाठी भव्य मेजवानीचे आयोजन केल्याची माहिती समोर येत आहे.

नवी दिल्ली : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. तर दुसरीकडे आर्थिक संकट आणि महागाईमुळे सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेचे जगणेही कठीण झाले आहे. असे असतानाही पाकिस्तानमधील  एका भिकारी कुटुंबाने हजारो लोकांसाठी भव्य मेजवानीचे आयोजन केल्याची माहिती समोर येत आहे. (A beggar family in Pakistan spent 1.25 crores to host a feast for 20 thousand people)

भिकाऱ्यांना पाहून आपल्या मनात दया येते. त्यामुळे आपण अनेकदा त्यांना काही रुपये देतो. पण अनेकदा अशा बातम्या समोर येतात की, भिकाऱ्याचे बँकेत खाते, त्यांच्याकडे लाखो रुपये सापडतात. त्यामुळे काही भिकारी आपल्या विचारांपेक्षा खूप श्रीमंत असू शकतात, यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. मात्र आता पाकिस्तानमधील गुजरानवाला भागातील  एका भिकारी कुटुंबाने सुमारे 20 हजार लोकांसाठी भव्य मेजवानीचे आयोजन केल्यााचे समोर येत आहे. विशेष म्हणजे या भिकारी कुटुंबाने मेजवाणीसाठी तब्बल 1.25 कोटी पाकिस्तानी रुपये खर्च केले.

- Advertisement -

हेही वाचा – Crime : किटी पार्टीमध्ये झाली कोट्यवधींची फसवणूक; नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आजीच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त भिकारी कुटुंबाने 20 हजार लोकांना मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवाणीसाठी येणाऱ्या पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी सुमारे दोन हजार वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली होती. तसेच मेजवानीत सिरी पाय, निहारी, मुरब्बा, मटण गोश्ट, नान मटर गंज आणि अनेक मिठाई मेनूमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. या मेजवानीसाठी सुमारे 250 बकऱ्यांची कत्तल करण्यात आली. पार्टीत आलेल्या पाहुण्यांना थंड पेयही देण्यात आले. मात्र या मेजवाणीवर झालेल्या खर्चामुळे भिकारी कुटुंबाच्या जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तसेच त्याच्याकडे एवढे पैसे आले कुठून? असा प्रश्नही सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

- Advertisement -

मेजवाणी प्रकरणी सोशल मीडियावर प्रश्नांचा पूर

दरम्यान, भिकारी कुटुंबाने दिलेल्या मेजवाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी एका यूजरने म्हटले की, भीक मागणे ही गोष्ट व्यवसाय म्हणून घोषित करावी आणि त्यावर कर लावावा. दुसऱ्या एका यूजर्सने म्हटले की, मेजवाणीसाठी उपस्थित असलेल्या एकानेही त्यांच्या उत्पन्नावर एक पैसाही कर भरला आहे का? पाकिस्तानातील व्यवस्था सडलेली असून ती बदलण्याची गरज आहे. आणखी एका यूजरने म्हटले की, मला बॅगर कम्युनिटीमध्ये सामील व्हायचे आहे.

हेही वाचा – Delhi Assembly Election : महाराष्ट्रानंतर दिल्लीची बारी, विधानसभा निवडणुकीसाठी आपची पहिली यादी जाहीर


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -