घरदेश-विदेशट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची मोठी घोषणा; आणणार नवे अॅप्लिकेशन

ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची मोठी घोषणा; आणणार नवे अॅप्लिकेशन

Subscribe

ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये ट्विटरचे सीईओ पद सोडले होते. त्यांनतर अवघ्या सहा महिन्या नंतर ते ट्विटरच्या संचालक मंडळातूनही बाहेर पडले.

सोशल मीडियाला सध्याच्या युगात खूपच महत्व प्राप्त झाले आहे. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अशी ओळख असलेले एलोन मस्क यांच्याकडे ट्विटरची सूत्रे आहेत. एलोन मस्क यांनी शुक्रवारी 28 ऑक्टोबर 2022 रोजी ट्विटर खरेदी करणायचा करार पूर्ण केला. 44 अब्ज डॉलर्समध्ये हा करार पूर्ण करण्यात आला. दरम्यान त्या नंतरच ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी हे नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणत असल्याची माहिती मिळत आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे म्हणजे, ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये ट्विटरचे सीईओ पद सोडले होते. त्यांनतर अवघ्या सहा महिन्या नंतर ते ट्विटरच्या संचालक मंडळातूनही बाहेर पडले. (A big announcement from former Twitter CEO Jack Dorsey; Bringing new application)

twitter
दरम्यान यानंतर जॅक डोर्सी आता ब्लूस्की सोशल या नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. जॅक डोर्सी यांच्या मते, ब्लूस्की ट्विटरशी कोणत्याही प्रकारची स्पर्धा करणार नाही.

- Advertisement -

याच संदर्भांत कंपनीने ट्विट करून सांगितले की, हे जगभरातील वेब ब्राउझरशिवाय तयार केले असल्याने ते खूप मनोरंजक नाही. 18 ऑक्टोबर रोजी कंपनीने एका ट्विटमध्ये म्हटल्या प्रमाणे, अशा परिस्थितीत आम्ही ब्लूस्की नावाचे सोशल अॅप्लिकेशन तयार करणार आहोत. या नवीन अॅपमध्ये युजर्स चांगल्या दर्जाचे ब्राउझर वापरून एकाचवेळी एकापेक्षा अधिक सोशल प्लॅटफॉर्मवर स्विच करू शकतील. त्यामुळे हे नवीन सोशल मीडिया अॅप्लिकेशन कसे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


हे ही वाचा – 2035 पर्यंत इस्रो बनविणार स्वतःचे स्पेस स्टेशन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -