घरअर्थजगतग्राहकांना मोठा धक्का, 'या' पाच बँकांतून काढता येणार नाही रक्कम; आरबीआयने लावले...

ग्राहकांना मोठा धक्का, ‘या’ पाच बँकांतून काढता येणार नाही रक्कम; आरबीआयने लावले निर्बंध

Subscribe

नवी दिल्ली – आर्थिक परिस्थिती ढासाळत असल्याचं कारण देत भारतीय रिझर्व बँकेने (Indian Reserve Bank) पाच सहकारी बँकांवर बंदी आणली आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातील पैसे काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. बँकांच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतरच या बँकांवरील बंदी उठवली जाईल, असं आरबीआयकडून (RBI) स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातील पैसे काढता येणार नाहीत.

या बँकांवर बंदी

- Advertisement -
  • शंकरराव मोहितेपाटील, अकलूज
  • एचसीबीएल सहकारी बँक, लखनौ
  • आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद
  • शिमशा सहकारी बँक, कर्नाटक
  • उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, आंध्र प्रदेश

वरील बँकांवर आरबीयआने निर्बंध आणले आहेत. यापैकी तीन बँकांवर अंशतः ठेवी काढण्याची बंदी तर दोन बँकांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच, ज्या बँकांवर अंशता ठेवी काढण्याची बंदी आहे त्या बँकेतील ग्राहक त्यांच्या खात्यातील थोडीफार रक्कम काढू शकतात. परंतु, ज्या बँकांवरपूर्ण बंदी घालण्यात आली आहे त्या बँकेतील ग्राहक त्यांच्या खात्यातील रक्कम काढू शकणार नाहीत.

हेही वाचा – शेअर बाजार थोड्याशा घसरणीसह बंद, रुपयाही डॉलरच्या तुलनेत मंदावला

- Advertisement -

शंकरराव मोहितेपाटील, अकलूज; उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, आंध्र प्रदेश आदी बँकेतून ग्राहक फक्त ५ हजार रुपये काढू शकणार आहेत. इतर बँकांमधील ग्राहक त्यांच्या ठेवी काढू शकणार नाहीत.

सहा महिने बँकांवर बंदी

पुढचे सहा महिने तरी या बँकांवर निर्बंध असणार आहेत. त्यामुळे सहा महिने बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहक त्यांच्या खात्यातील पैसे काढू शकणार नाहीत. तसंच, आरबीआयच्या परवानगीशिवाय बँक कोणालाही कर्ज देऊ शकणार नाही, अथवा नवे कर्ज घेऊ शकणार नाही. याशिवाय, बँक मालमत्ता हस्तांतरणही करू शकणार नाही. निर्बंध काळात बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. आढावा घेतल्यानंतर बँकांवरील निर्बंध हटवले जाऊ शकतात. कारण या बँकांचा परवाना अद्यापही रद्द करण्यात आलेला नाही.

हेही वाचाSBI ने लॉंच केली धांसू FD स्कीम, ४०० दिवसांसाठी मिळेल ७.६० टक्क्यांपर्यंत व्याज, ‘या’ तारखेपर्यंत संधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -