Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'सनफिस्ट'च्या एका बिस्किटाची किंमत एक लाख रुपये! ग्राहकाच्या नशिबी मनस्ताप अन् पैसे...

‘सनफिस्ट’च्या एका बिस्किटाची किंमत एक लाख रुपये! ग्राहकाच्या नशिबी मनस्ताप अन् पैसे देखील

Subscribe

चेन्नई : चेन्नईमध्ये सनफिस्ट ब्रँडच्या एका बिस्कीटाची किंमत एक लाख रुपये मोजावी लागली आहे. बिस्किटांच्या एका पॅकेटचे वजन साधारणतः 50 ते 100 ग्रॅम असते. अनेक ग्राहक बिस्किटे खाण्यापूर्वी सहसा पाकिटात ती किती आहेत, हे मोजत नाहीत. मात्र, बहुतांश पाकिटांवर आतील बिस्किटांची संख्या स्पष्टपणे लिहिलेली असते. पण यामुळेच एका ग्राहकाला सुरुवातीला मनस्ताप सहन करावा लागला, पण नंतर पैसे देखील मिळाले.

- Advertisement -

चेन्नईच्या एमएमडीए, माथुर येथे राहणाऱ्या पी. दिलीबाबू यांनी 2021मध्ये ‘सनफिस्ट मेरी लाइट’ बिस्किटांचे एक पाकीट विकत घेतले. पी. दिलीबाबूंनी पाकिटातील बिस्किटांची संख्या मोजली तेव्हा त्यांना एक बिस्किट कमी असल्याचे आढळले. त्या पाकिटात 16ऐवजी 15 बिस्किटे होती. एक बिस्कीट कमी असल्याचे पी दिलीबाबू स्थानिक दुकानदाराला सांगितले. पण त्याच्याकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी या घटनेबद्दल आयटीसीकडून (सनफिस्ट ब्रँड) खुलासा मागितला, परंतु तेथूनही त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

हेही वाचा – धर्मांतराची याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टाने वकिलाला सुनावले, म्हणाले….

- Advertisement -

ग्राहकमंचाकडे धाव
यानंतर दिलीबाबूंनी ग्राहक मंचात धाव घेतली. आयटीसी आणि बिस्किटांची विक्री करणाऱ्या दुकानाविरुद्ध याचिका दाखल करत, कथित कृत्यासाठी 100 कोटी रुपये दंड आकारण्यात यावा, तसेच अनुचित व्यापार पद्धती आणि सेवेतील त्रुटी यासाठी 10 कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, पाकिटातील बिस्किटांच्या संख्येशी दुकानदाराचा काहीच संबंध नसल्याचे ग्राहक मंचाने स्पष्ट केले.

उत्पादनाची विक्री केवळ वजनाच्या आधारावर केली गेली आणि बिस्किटांच्या संख्येच्या आधारावर नाही, असा युक्तिवाद कंपनीतर्फे करण्यात आला. तथापि, कंपनीचा हा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला नाही. खरेदीदार वजन करून नव्हे तर पाकीट पाहून बिस्किटे खरेदी करतात, असे आदेशात म्हटले आहे. जाहिरातनुसार बिस्किटांच्या पाकिटाचे वजन 76 ग्रॅम असणे अपेक्षित होते, मात्र ग्राहक मंचाने तपास केला असता 15 बिस्किटे असलेल्या सर्व पाकिटांचे वजन केवळ 74 ग्रॅम असल्याचे आढळले.

हेही वाचा – Live In : जोडीदाराचा धर्म वेगळा असला तरीही पालक मुलांना…; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सनफिस्ट मेरी लाइट या बिस्किट ब्रँडच्या पाकिटावर नोंदवलेल्या बिस्किटांच्या संख्येपेक्षा एक बिस्कीट कमी आढळल्याने जिल्हा ग्राहक मंचाने 29 ऑगस्ट रोजी संबंधित ग्राहकाला एक लाख रुपयांची भरपाई आणि या दाव्याच्या खर्चापोटी वेगळे 10 हजार रुपये देण्याचे आदेश आयटीसी लिमिटेडला दिले.

- Advertisment -