घर देश-विदेश शेतकऱ्यांना अनन्यसाधारण शक्तीचे वरदान, त्यांच्या संवर्धनाची गरज- राष्ट्रपती मुर्मू

शेतकऱ्यांना अनन्यसाधारण शक्तीचे वरदान, त्यांच्या संवर्धनाची गरज- राष्ट्रपती मुर्मू

Subscribe

नवी दिल्ली : वनस्पतींच्या जाती आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करताना भारतीय कायदे संपूर्ण जगासाठी एक मॉडेल बनू शकतात. कारण हवामान बदलामुळे हे अधिक महत्त्वाचे झाले आहेत. सोबतच शेतकऱ्यांना अनन्यसाधारण शक्तिचे वरदान असून, त्यांच्या संरक्षण देऊन त्यांच्या संवर्धनाची गरज आहे. असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी केले. त्या दिल्लीतील पुसा कॉम्प्लेक्समध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांवरील पहिल्या जागतिक परिसंवादाला संबोधित करताना बोलत होत्या.(A boon of unique power to farmers need for their conservation President Murmu)

पुढे बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताने 2001 मध्येच वनस्पती जाती आणि शेतकरी हक्क कायदा द्वारे या प्रकरणात पुढाकार घेतला होता. PPVFR कायद्यांतर्गत, भारतातील शेतकऱ्यांना नोंदणीकृत वाणांचे बियाणे वापरण्याचा, जतन करण्याचा, विक्री करण्याचा आणि सामायिक करण्याचा अधिकार यासारखे अनेक अधिकार मिळतात. शेतकरी स्वतःच्या विविध बियाणांची नोंदणी देखील करू शकतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना सुरक्षा मिळते. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांची पूर्तता करणार्‍या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरही याला खूप महत्त्व आहे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

भरड धान्य उत्पादनाला चालना

- Advertisement -

हवामान बदलामुळे भारतीय शेतकरी पारंपारिक पिके, भरड धान्य इत्यादींचे उत्पादन घेत आहेत. यामुळे केवळ पर्यावरणालाच फायदा होत नाही तर बाजरीचे अनेक आरोग्य फायदेही आहेत. 2023 हे वर्ष बाजरीचे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. राष्ट्रपतींनी प्लांट अथॉरिटी बिल्डिंग आणि ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटनही केले. या पोर्टलवर विविध प्रकारच्या वनस्पतींची नोंदणी करता येणार आहे.

हेही वाचा : CBI मधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज नाही – सर्वोच्च न्यायालय

मोगी माता बियाणे संवर्धन समितीला पुरस्कार

- Advertisement -

2020-21 या वर्षासाठीचे वनस्पती अनुवांशिकी संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात वनस्पती अनुवांशिकी संवर्धन समुदाय पुरस्कार आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव इथल्या याहा मोगी माता स्थानिक बियाणे संवर्धन समितीला प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 10 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हेही वाचा : गृहिणींनो आपले डबे, बटवे तपासून घ्या; 2 हजारांच्या नोटा बदलण्याची शेवटची संधी

108 स्थानिक वाणांचे संवर्धन

धडगाव तालुक्यातल्या 10 गावांमध्ये ही समिती कार्यरत असून हरणखुरी आणि चोंदवडे या दोन गावांमध्ये समितीने बीज बँका स्थापन केल्या आहेत. समितीशी संलग्न स्थानिक शेतकरी मका, ज्वारी, विविध भरडधान्य, कडधान्य, स्थानिक भाज्या, अशा 108 स्थानिक पीक वाणांचे संवर्धन करत आहेत.

- Advertisment -