घरदेश-विदेशउंदराने लावली कार सर्व्हिस सेंटरला आग, झालं एक कोटींचं नुकसान

उंदराने लावली कार सर्व्हिस सेंटरला आग, झालं एक कोटींचं नुकसान

Subscribe

तेलंगणामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेलंगणामधील मारुती नेक्सा कार सर्व्हिस सेंटरमध्ये फेब्रुवारीमध्ये भीषण आग लागली. या आगीमुळे कंपनीला १ कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले. दरम्यान, आता सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून आगीचे कारण स्पष्ट झाले आहे.

हैदराबादच्या मुशीराबाद येथील मारुती नेक्सा कार सर्व्हिस सेंटरला ८ फेब्रुवारी रोजी भीषण आग लागली. मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली. या अपघातात तीन कार जळून खाक झाल्या आणि १ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. परंतु घटनेच्या सहा महिन्यांनंतर ही आग कशी लागली हे समोर आले आहे. एका उंदरामुळे या कार सर्व्हिस सेंटरला आग लागली आहे.

- Advertisement -

TOI चे यू सुधाकर रेड्डी यांनी दिलेल्या वृत्तानुसार, घटना घडलेल्या त्या रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसते की एक लहान उंदरामुळे ही आग लागली. दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण शॉर्टसर्किट असल्याचे सांगत बंद केले आहे. परंतु त्या रात्रीच्या सीटीटीव्ही फुटेजची तपासणी करणार्‍या खासगी फॉरेन्सिक एजन्सी सत्य लॅबने आग कशी लागली याची माहिती दिली.

अशी लागली आग

७ फेब्रुवारी रोजी सकाळी कार सर्व्हिस सेंटरमध्ये पूजा केली गेली. एका कर्मचाऱ्याच्या हातात दिवा होता. हे फुटेज सकाळी दहाच्या सुमाराचे आहेत. खोलीत हवा नसल्यामुळे दिवा रात्रीपर्यंत जळत होता. ११:५१ वाजता फुटेजमध्ये ग्राहक सेवा कक्षातील टेबलवर एक उंदीर दिसतो. ११:५५ वाजता सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये काही ज्वलनशील साहित्य घेऊन जाताना उंदीर दिसत आहे. असा दावा आहे की ती दिव्याची एक वात होती. मग एका सेकंदाच्या आत, उंदीर खुर्चीजवळ जातो. त्यानंतर काही क्षणातच आग लागते. थोड्यावेळाने आग उग्र रुप धारण करते. या आगीत तब्बल १ कोटीहून अधिक नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावणाऱ्यांना दिलासा; तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -