घरदेश-विदेशइस्रोची कौतुकास्पद कामगिरी, आरएलव्हीच्या ऑटोनॉमस लँडिंगची यशस्वी चाचणी

इस्रोची कौतुकास्पद कामगिरी, आरएलव्हीच्या ऑटोनॉमस लँडिंगची यशस्वी चाचणी

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) रविवारी रीयुझेबल लॉन्च व्हेईकल ऑटोनॉमस लँडिंगची (Reusable Launch Vehicle – RLV LEX) यशस्वी चाचणी केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) तसेच भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने इस्रोतर्फे कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एटीआरमध्ये ही चाचणी करण्यात आली. या यशस्वी चाचणीद्वारे इस्रोने प्रक्षेपण यानाच्या स्वयंचलित लँडिंगच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, असे इस्रोने म्हटले आहे.

रीयुझेबल लॉन्च व्हेईकल ऑटोनॉमस लँडिंग मिशनची यशस्वी चाचणी केल्याने भारत पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण यानाच्या क्षेत्रातील आपले ध्येयाच्या आणखी जवळ पोहोचले आहे, असे इस्रोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. धावपट्टीवर स्वायत्त लँडिंगसाठी सोडले. जगात प्रथमच हेलिकॉप्टरच्या मदतीने ‘विंग बॉडी’ 4.5 किलोमीटर उंचीवर नेण्यात आली आणि नंतर स्वयंचलित लँडिंगसाठी धावपट्टीवर सोडण्यात आले.

- Advertisement -

भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरद्वारे आरएलव्हीने सकाळी 7.10 वाजता 4.5 किमी (समुद्र सपाटीपासून वर) उंचीवर उड्डाण केले. सेट केलेल्या पॅरामीटर्सपर्यंत पोहोचल्यानंतर, मिशन मॅनेजमेंट कॉम्प्युटरच्या कमांडच्या आधारे आरएलव्हीला मधेच 4.6 किलोमीटरच्या रेंजमध्ये सोडण्यात आले. स्थिती, वेग, उंची इत्यादींसह 10 पॅरामीटर्सचे परीक्षण केले गेले आणि ते पूर्ण झाल्यानंतर आरएलव्ही सोडण्यात आले. आरएलव्ही सोडण्याची प्रक्रिया स्वयंचलित होती. आरएलव्हीने एकात्मिक नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणालीचा वापर करत खाली उतरण्यास सुरुवात केली आणि सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी स्वतंत्रपणे लँडिंग केले.

- Advertisement -

स्पेस री-एंट्री व्हेईकल लँडिंगच्या अचूक परिस्थितीत स्वायत्त लँडिंग केले गेले. “RLV LEX साठी विकसित केलेल्या समकालीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे ISRO ची इतर प्रक्षेपण वाहने देखील अधिक किफायतशीर बनवते,” असे निवेदनात म्हटले आहे. स्पेस री-एंट्री व्हेईकल लँडिंगच्या अचूक नियमांनुसार हे स्वयंचलित लँडिंग केले गेले.

पंतप्रधान मोदींकडून इस्रोचे कौतुक
पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण यानाचे स्वयंचलित लँडिंग मिशन संचलित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे कौतुक केले. हा एक उत्तम सांघिक प्रयत्न असून या यशामुळे आपल्याला पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण यान साकारण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल जवळ गेलो आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -