घरट्रेंडिंगवृद्ध जोडप्याला सापडल्या जुन्या नोटा, तब्बल ४७ लाखांचा धनलाभ

वृद्ध जोडप्याला सापडल्या जुन्या नोटा, तब्बल ४७ लाखांचा धनलाभ

Subscribe

एका वृद्ध जोडप्याला जुन्या नोटा सापडल्याची माहिती समोर आली आहे. या जुन्या नोटांचा लिलाव झाला तेव्हा त्यांची किंमत तब्बल ४७ लाख रुपयांपेक्षा जास्त झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांना एकूण ९ नोटा सापडल्या होत्या, त्या साधारण १९१६ ते १९१८ सालातील असल्याचं म्हटलं जातंय. या नोटा फार दुर्मिळ असल्याचं म्हटलं जातंय, त्यामुळे या नोटा सापडल्याने वृद्ध दाम्प्त्याला चांगलाच धनलाभ झाला आहे.

ब्रिटनच्या ब्रिस्टल येथे विक आणि जानेट हे वृद्ध दाम्प्त्य राहतं. विक पेशाने बांधकाम व्यावसायिक होते तर, जानेट या टेक्निशिअन होत्या. ३० वर्षांपूर्वी त्यांनी घराची डागडुजी केली होती. त्यावेळी त्यांना या ब्रिटनकाळातील जुना नोटा सापडल्या. या नोटा १०० वर्षे जुन्या आहेत. या नोटांची एवढी किंमत मिळेल अशी त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. त्यामुळे त्यांनी एवढी वर्ष या नोटांचा लिलाव केला नाही. या नोटांतून फारफार पावणे तीन किंवा तीन लाख रुपये मिळतील, असं त्यांना वाटलेलं. त्यामुळे या नोटा विकून त्यांना त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा होता. त्यांना क्रूझवर जाऊन लग्नाच्या वाढदिवसाचं नियोजन करायचं होतं. त्यामुळे त्यांनी या नोटा विकण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बँक नोट्स सोसायटीचे अध्यक्ष यांनी या नोटा विकत घेतल्या. एका नोटेची किंमत सात लाखापर्यंत गेली तर, ५ पाऊंडच्या किंमतीच्या असलेल्या नोटा ३ नोटा प्रत्येकी १४.७३ लाखांना विकल्या गेल्या. या सर्व नोटांची किंमत ४७ लाख ४२ हजार २७१ रुपये झाली. अनपेक्षितपणे जास्त रक्कम मिळाल्याने या वृद्ध दाम्पत्याला आनंद झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -