कोरोनापेक्षाही अधिक धोकादायक आहे ‘बुरशी’ रोग; वैज्ञानिकांनीही व्यक्त केली भिती

कोरोनापेक्षाही अधिक धोकादायक रोगाची भिती.

a deadly fungal infection strikes
कोरोनापेक्षाही अधिक धोकादायक आहे 'बुरशी' रोग; वैज्ञानिकांनीही व्यक्त केली भिती

आतापर्यंत जगातील लोक कोरोना विषाणूमुळे त्रस्त झाले होते. मात्र, आता कोरोना विषाणूपेक्षाही अधिक धोकादायक रोगाने जगात एन्ट्री केली आहे. या रोगामुळे सगळेच चिंतेत आले आहेत. हा रोग फार भयंकर असून याचा फैलाव अधिक वेगाने होत असल्याची भिती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. हा एक बुरशी रोग असून ‘कँडिला ऑरिसा’ असं या रोगाचे नाव आहे. हा रोग काळ्या प्लेगमुळे पसरत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा रोग अत्यंत धोकादायक मानला जाणारा रोग आहे. तसेच या रोगाचा फैलाव देखील अधिक वेगाने होतो.

महामारी आणण्यास अधिक सक्षम

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, ‘कोरोनापेक्षाही ‘कॅंडिला ओरिस’ हा धोकादायक बुरशी रोग आहे. कारण त्याचा प्रसार हा कोरोनापेक्षाही अधिक वेगाने होत आहे. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, ‘कॅंडिला ऑरिस’ अधिक सक्षम आहे. तर सीडीसी संबंधित शास्त्रज्ञांनी सांगितले की, ‘जर ही बुरशी रुग्णालयात पसरली तर ती खूप धोकादायक होईल’.

२००९ला झाली ‘कॅंडिला ऑरिस’ची ओळख

लंडन इम्पीरियल कॉलेजमधील तज्ज्ञ जोहाना रोड्स यांनी सांगितले की, ‘कॅंडिला ऑरिस’ हा फार काळ टिकणारा आजार आहे. २०१६ला ते स्वत: या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी एका टीममध्ये काम करत होते. त्यांनी सांगितले की, या रोगाची तुलना ब्लॅक प्लेगशी केली जाते. कारण या रोगाचा प्रसार माकडापासून होत असल्याचे समोर आले आहे.

आरोग्य सुधारण्याची गरज

कोरोनाच्या महामारीमुळे जगातील सर्वच लोकांनाचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वत: च्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण पुढील काळात अनेक साथीच्या रोगांचा पसार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हेही वाचा – कोरोनाग्रस्‍त अर्थव्‍यवस्‍थेला आत्‍मनिर्भरतेचा डोस