घरताज्या घडामोडीभारत जोडो यात्रा : राकेश टिकैतसह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राहुल गांधींची भेट

भारत जोडो यात्रा : राकेश टिकैतसह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राहुल गांधींची भेट

Subscribe

संपूर्ण देशभरातून भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा हरियाणातील कुरूक्षेत्रात सुरू आहे. आज सकाळी खानापूर कोलियामधून भारत जोडो यात्रेला सुरूवात झाली आहे. त्यानंतर दिल्ली-चंदीगड महामार्गावरील एका सरदारजी ढाब्यावर टी-ब्रेकसाठी ही यात्रा थांबवण्यात आली होती. शाहबाद येथील विश्रामगृहात विश्रांती घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी शेतकरी नेत्यांशी चर्चा केली.

राहुल गांधी यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत, युद्धवीर सिंह, योगेंद्र यादव यांच्याशी जवळपास 1 तास चर्चा केली. पंजाबच्या शेतकरी नेत्यांशिवाय शेतकर्‍यांशी संबंधित विविध प्रश्नांवर, तसेच दिल्ली सीमेवर एक वर्ष चाललेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाबाबतही चर्चा केली. एवढं मोठं आंदोलन एक वर्ष कसं चाललं, हे जाणून घेण्याचा राहुल गांधी यांनी प्रयत्न केला.

- Advertisement -

भारत जोडो यात्रा आता पट्टी बोरीपूर गावात आहे. ज्यामध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत आणि युद्धवीर सिंह यांच्याशिवाय इतर शेतकरी नेतेही राहुल गांधींसोबत फिरत आहेत. राहुल गांधी यांचा आजचा दौरा महिला विशेष आहे. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. यावेळी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे.

- Advertisement -

माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांच्यासोबत अनेक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होत राहुल गांधींना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा असताना शिवसेनेकडून आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत पदयात्रेत दाखल झाले होते. त्यानंतर आता उत्तरेत जाऊन खासदार संजय राऊत हे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.


हेही वाचा : मद्यधुंद अवस्थेत तरुणांनी विमानात घातला गोंधळ, एअर होस्टेसशी गैरवर्तन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -