घरदेश-विदेशकोंबड्याच्या आरवण्याने डॉक्टरची झोपमोड, मोदींनी केली पोलिसांत तक्रार दाखल

कोंबड्याच्या आरवण्याने डॉक्टरची झोपमोड, मोदींनी केली पोलिसांत तक्रार दाखल

Subscribe

इंदौर – मध्य प्रदेशच्या इंदौरमधील एका कर्करोगतज्ज्ञ डॉक्टराने सार्वजनिक उपद्रव केल्याप्रकरणी पोलीस तक्रार केली आहे. कोंबड्याच्या आरवण्याने डॉक्टरची झोपमोड होत असल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोंबड्याच्या आवाजाला वैतागून पोलीस तक्रार करण्यात आल्याने याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

कोंबडा सतत आरवत नसल्याने डॉक्टरांची झोपमोड होत होती. शेजारच्या घरांत चार-पाच कोंबड्या आणि कुत्रे आहेत. हे कोंबडे आणि कुत्रे रोज सकाळ सकाळी घराबाहेर निघतात. कोंबड्या सकाळी चार पाच वाजल्यापासूनच आरवायला सुरुवात करतात. त्यामुळे डॉक्टराची झोपमोड होते. आलोक मोदी असं या डॉक्टरचं नाव आहे.

- Advertisement -

पलासिया पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, वंदना विजयन या डॉ. मोदींच्या शेजारी राहतात. त्यांनी घरात कोंबडी आणि कुत्री पाळली आहेत. पोलिसांनी सार्वजनिक उपद्रव कलम 138 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अलीकडच्या काळात प्रथमच असे प्रकरण समोर आले आहे. यापूर्वी अजानमुळे होणाऱ्या समस्यांबाबत तक्रारी आल्या होत्या. मात्र, ते केवळ राजकारणी आणि इतरांच्या भाषणबाजीपुरतेच मर्यादित राहिले आहे. इंदूरमध्ये डॉक्टरने दाखल केलेल्या गुन्ह्याची जोरदार चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -