विमानात मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर केली लघुशंका, पोलिसांकडून अटक

नवी दिल्ली : न्यूयॉक्त-नवी दिल्ली अमेरिकन कंपनीच्या एका विमानात मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत सूत्रांनी आज माहिती दिली. ही घटना विमान क्रमांक AA292 मध्ये घडली. शुक्रवारी रात्री 9:16 वाजता या विमानाने न्यूयॉर्कहून दिल्लीसाठी उड्डाण केले आणि 14 तास 26 मिनिटांच्या उड्डाणानंतर शनिवारी रात्री 10:12 वाजता नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर उतरले.

विमानतळावर काम करणाऱ्या एका कामगाराने सांगितले की, लघुशंका करणारा आरोपी अमेरिकन विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांने पीडित पुरुषाची माफी मागितल्यानंतर पीडिताने पोलिसांकडे जाण्यास टाळाटाळ केली, कारण यामुळे विद्यार्थ्यांचे करियर धोक्यात येऊ शकते. मात्र विमान कंपनीने ही गोष्ट गांभिर्याने घेत आयजीआय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) याबाबत कळवले.

विमानात कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळल्यानंतर त्यांनी पायलटला याची माहिती दिली आणि पायलटने एटीसीला ही बाब कळवली. एटीसीने सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना सावध केले आणि आरोपी प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले.

विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशाने सांगितले की, या घटनेची माहिती मिळाल्यानंत सीआरएसएफसह विमान कंपनीचे स्वत:चे सुरक्षा रक्षक पथक कृतीत उतरले. विमान नवी दिल्लीला उतरताच आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस सहप्रवाशांचे जबाब नोंदवत आहेत.

नागरी विमान वाहतूक नियमांनुसार जर एखादा प्रवासी अनियंत्रित वर्तनासाठी दोषी आढळल्यास त्याला किंवा तिला गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई व्यतिरिक्त, गुन्ह्याच्या पातळीनुसार विशिष्ट कालावधीसाठी उड्डाण करण्यास बंदी घालण्यात येते. मद्यधुंद अवस्थेत प्रवाशाने सहप्रवाशासोबत असे कृत्य केल्याची गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.

गेल्या वर्षीही अशीच घटना घडली
26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये ७० वर्षीय मद्यधुंद प्रवाशाने कपडे काढून सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून संबंधित आरोपी मुंबईतील व्यावसायिक आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता त्यांने समजले की, आरोपीचे नाव शेखर मिश्रा असून त्याचे वय ४० ते ४५ दरम्यान आहे.