Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी अज्ञान व्यक्तीचा वरातीत नाचणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

अज्ञान व्यक्तीचा वरातीत नाचणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

Subscribe

हमीरपूर येथील एका पोलिस ठाण्याच्या शेजारी एका लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. आरोपीने पीडितेवर बलात्कर केल्यानंतर तिला जीवेमारण्याची धमकी देत तेथून पळ काढला.

उत्तर प्रदेशात एका अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उत्तर प्रदेशातल्या हमीरपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. हमीरपूर येथील एका पोलिस ठाण्याच्या शेजारी एका लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. आरोपीने पीडितेवर बलात्कर केल्यानंतर तिला जीवेमारण्याची धमकी देत तेथून पळ काढला.

पोलिसांनी दिली माहिती

या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी सदर आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीत फरार आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेची अधिक माहिती देताना हमीरपूर जिल्ह्याचे पोलिस आयुक्त श्लोक कुमार यांनी सांगितले आहे की, ‘सुमेरपुर पोलिस ठाण्याच्या शेजारी एका सभागृहात लग्न समारंभ चालू होता, या समारंभात एक १३ वर्षाची अल्पवयीन मुलगी वरातीत नाचत होती. त्यावेळी या नराधमाने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहान्याने सभाग्रहाच्या मागे घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार करत बलात्कार केला त्यानंतर पीडित मुलीला जीवेमारण्याची धमकीदेत तेथून त्याने पळ काढला’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांना याची माहिती देताच पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

पीडितेच्या आईची पोलिसात धाव

- Advertisement -

या संपूर्ण घटनेनंतर पीडित मुलीने सभागृहात जाऊन आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. ही संपूर्ण बाब लक्षात आल्यावर पीडिचतेच्या आईने तडक पोलीस ठाण्यात धाव घेत याची माहिती पोलिसांना दिली आहे. सुमेरपुर येथील पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्या अज्ञात व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. पीडित मुलीला पोलिसांनी वैद्यकिय तपासणीसाठी रूग्णालयात दाखल केले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -