मालकाला सलाम! कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून दिले कार आणि बाईक

दिवाळी बोनस किंवा गिफ्ट म्हणून तुम्हाला आतापर्यंत काय काय मिळालं आहे? जर येत्या दिवाळीत दिवाळी गिफ्ट किंवा बोनस म्हणून तुमच्या बॉसने तुम्हाला कार किंवा बाईक दिली तर? ही अतिशयोक्ती नाही, तामिळनाडूतील एका सरफाने आपल्या कर्मचाऱ्यांना कार आणि बाईक भेट दिली आहे. यासाठी त्यांनी १.२ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

तामिळनाडूतील एका सराफाने दिवाळीच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी गेट टुगेदरचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ८ कर्मचाऱ्यांना कार आणि चांगली कामगिरी करणाऱ्या १८ कर्मचाऱ्यांना बाईक भेट दिली आहे. जयंतीलाल चलानी असं या सराफा मालकाचं नाव आहे.


जयंतीलाल म्हणाले की, माझा स्टाफ माझ्यासाठी कुटुंबाप्रमाणेच आहे. माझ्या चांगल्या-वाईट काळात माझ्या कर्मचाऱ्यांनी मला मदत केली आहे. या गिफ्टच्या माध्यमातून मी त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी मी दिवाळी बोनस दिला आहे. कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांना सरप्राईज गिफ्ट दिलं नाही.