प्रयागराजच्या गंगा नदीकाठी पुन्हा कोरोनासदृश परिस्थिती; वाळूत सर्वत्र मृतदेह पुरल्याचे चित्र

a larges numbers of death bodies are buried in the sand on banks of river ganga in prayagraj
प्रयागराजच्या गंगा नदी काठी पुन्हा कोरोना सदृश स्थिती; वाळूत मृतदेह पुरल्याचे चित्र

प्रयागराजच्या संगम शहराती पुन्हा एकदा गंगा नदीच्या काळावरील वाळूत मोठ्याप्रमाणात मृतदेह पुरले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ही घटना संगम शहर प्रयागराज येथील फाफामाऊ घाटाशी संबंधित आहे, या ठिकाणी मोठ्याप्रमाणात मृतदेह पुरले जात आहे. येथील दृश्यांमुळे पुन्हा एकदा कोरोना काळातील भयानक आठवणी समोर येत आहेत. एनजीटी आणि जिल्हा प्रशासनाने गंगेच्या घाटांवर मृतदेह पुरण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही परंपरेच्या नावाखाली ज्या प्रकारे मृतदेहांचे दफन केले जात आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे. फाफमाऊ घाटात दररोज डझनभर मृतदेह वाळूत पुरले जात आहेत. त्यामुळे याठिकाणी कुठेही नजर टाकली तर सर्व ठिकाणी फक्त आणि फक्त अर्धवट अवस्थेत पुरलेल्या मृतदेहांच्या कबरीच दिसत आहेत.

NGT च्या सुचनांचे उल्लंघन

फाफामाऊ घाटावर जी परिस्थिती दिसते ती अतिशय चिंताजनक आहे. प्रशासनाकडून वारंवार सुचना देऊनही केवळ या सुचनांना पायदळी तुडवले जात आहे. यामुळे एनजीटीच्या सूचनांचेही खुलेआमपणे उल्लंघन केले जात आहे. प्रत्यक्षात मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी महिन्याभरापेक्षा कमी कालावधी शिल्ल आहे, अशा स्थितीत गंगा नदीच्या काठी मृतदेहांचे दफन केले जात असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याबरोबर रोगराई पसरण्याचा धोका अधिक वाढतोय. त्यामुळे वाळूत पुरलेले मृतदेह गंगेतच वाहून जाणार नाहीत तर नदीही प्रदूषित करण्यास कारणीभूत ठरणार आहेत. मात्र जिल्हा प्रशासनापासून ते महापालिकेपर्यंत याकडे पाठ फिरवत आहेत.

नारिकांकडून प्रशासनावर गंभीर आरोप

कोरोनाच्या काळात गंगेच्या काठावर वाळूत मृतदेह पुरल्याच्या बातम्या आल्यानंतर महापालिकेने शेकडो मृतदेह वाळूतून बाहेर काढून त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. मात्र आता याठिकाणी मृतदेह पुरण्यास बंदी असतानाही मृतदेह दफन करण्याचा मन हेलावून टाकणारा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. त्याच अंत्यसंस्कारासाठी फाफमाऊ घाटावर पोहोचलेल्या लोकांनी घाटाची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगितले. याकडे प्रशासन आणि महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप लोक करत आहेत. फाफामाऊ घाटावर विद्युत स्मशानभूमी आणि अंत्यसंस्कारासाठी लाकडे असल्यास अशा प्रकारे मृतदेह पुरण्याची गरज भासणार नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. जरी काही लोक मृतदेह दफन करण्याची परंपरा देखील जोडतात.