घरदेश-विदेशकार गेली थेट विमानाखाली... दिल्ली विमानतळावरील मोठी दुर्घटना टळली!

कार गेली थेट विमानाखाली… दिल्ली विमानतळावरील मोठी दुर्घटना टळली!

Subscribe

नवी दिल्ली : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हलगर्जीपणाचे एक प्रकरण समोर आले आहे. या विमानतळावर एक कार थेट इंडिगो (IndiGo) विमानाच्या पुढील भागाखाली गेली. सुदैवाने पुढील चाकाला धडक बसली नाही, त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.

- Advertisement -

 

इंदिरा गांधी एअरपोर्टच्या टी-२ टर्मिनल स्टॅण्ड नंबर २०१वर ही घटना घडली. गो फर्स्ट (Go First) कंपनीची ही कार असून ती इंडिगो एअरलाइनच्या A320neo विमानाखाली आली. डीजीसीए (DGCA) या संपूर्ण प्रकराची चौकशी करत आहे.

- Advertisement -

गो फर्स्ट कारच्या चालकाने मद्यपान केले आहे, याचीही पडताळणी घेण्यात आली. त्याची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट केली असता, त्याने मद्यपान केले नसल्याचे स्पष्ट झाले. तथापि, या घटनेत विमानाचे कोणतेही नुसकान झाले नाही, तसेच सुदैवाने जीवितहानी देखील झाली नाही. नंतर हे विमान पाटण्याला रवाना झाले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -