घरदेश-विदेशदिवाळीच्या मुहूर्तावर ब्रिटनच्या मंत्रिमंडळात मोठा फेरफार; माजी पंतप्रधानांना दिली 'ही' जबाबदारी

दिवाळीच्या मुहूर्तावर ब्रिटनच्या मंत्रिमंडळात मोठा फेरफार; माजी पंतप्रधानांना दिली ‘ही’ जबाबदारी

Subscribe

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळावर मोठे फेरबदल केले आहेत. भारतीय वंशाचे गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी पोलिसांवर केलेल्या टीकेमुळे त्यांची पदावरून हक्कापट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी जेम्स क्लेवर्ली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशाचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

डेव्हिड कॅमेरून यांनी 2010 ते 2016 पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान राहिले होते. डेव्हिड कॅमेरून यांच्या कारकीर्दीत ब्रिटनेने युरोपियन युनियनमधून वेगळे होण्याच्या बाजूने मतदान केले होते. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री पदी नियुक्ती केल्यानंतर डेव्हिड कॅमेरून यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मला पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम करण्यास सांगितले असून मी ते मान्य देखील केले आहे. युक्रेनमधील युद्ध, आंतरराष्ट्रीय आव्हान आणि मध्यपूर्वेतील संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डेव्हिड कॅमेरून पुढे म्हणाले, “मी सात वर्षापासून राजकारणापासून दूर राहिलो आहे. मला आशा आहे की, 11 वर्षे केंझर्व्हेटिव्ह नेत आणि सहा वर्ष पंतप्रधान म्हणून माझा अनुभव हा महत्त्वाच्या तोंड देण्यासाठी मदत करेले, अशी आशा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – फोल आश्वासने देऊन गेले शेठजी…, दीपोत्सवाच्या काळ्या बाजूवरून दानवेंचा मोदी सरकारवर निशाणा

‘या’ कारणामुळे सुएला ब्रेव्हरमन यांची उचलबांगडी

ब्रिटनचे भारतीय वंशाचे गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी पॅलेस्टाईन समर्थक आंदोलकांवर पोलीस सहानभूती दाखवत असल्याचा आरोप केला होता. ब्रेव्हर यांच्या टिप्णीमुळे पीएम ऋषी सुनक यांच्यावर कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या अनेक सदस्यांचा दबाव असल्यामुळे त्यांनी ब्रेव्हरमन यांची गृहमंत्री पदावर हकालपट्टी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -