धक्कादायक! बलात्कार झाल्यानंतर तरुणीने स्वतःला घेतले पेटवून!

राजस्थानमधील ही धक्कादाय घटना असून या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

A Man Allegedly Sexually Harassed And Burned A Girl In A Village Of Boondi District Of Rajasthan
धक्कादायक! बलात्कार झाल्यानंतर तरुणीने स्वतःला घेतले पेटवून!

राजस्थान मधील बुंदी जिल्ह्यातील गेंदोली परिसरातील चौत्र का खेरा गावात काल एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली. याच तरुणीने आज सकाळी स्वतःला पेटवून घेतल्याने समोर आले आहे. त्यामुळे या तरुणीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला जाणार आहे, अशी माहिती गेंदोली पोलिस ठाण्यात एजाज अहमद यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली.

तरुणीच्या शेजाऱ्याने हा प्रकार केला असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपीने रविवारी रात्री पीडित तरुणीवर बलात्कार केला. आगीच्या घटनेनंतर दोन गोष्टी समोर आल्या आहेत. एकीकडे स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, तरुणीच्या मामाने आरोप केला आहे की, रविवारी रात्री आरोपीने तरुणीवर बलात्कार केला आणि सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास आरोपीने तिच्यावर डिझेल ओतून जाळले. तसेच तरुणीच्या आईने पीडितेला जळताना आणि तरुणाला शिड्यांवरून पळताना पाहिल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे याच प्रकरणी एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बलात्कार झाल्यानंतर पीडित तरुणीने स्वतःला पेटवून घेतले, असे पोलिसांचे म्हणे आहे. पोलीस कर्मचारी एजाज अहमद यांनी सांगितले की, आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला जाणार आहे. बुंदी जिल्हा रुग्णालयात तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.


हेही वाचा – लॉकडाऊनमध्ये वाहनचालकांकडून पैसे उकळणाऱ्या पोलिसासह दोघांवर गुन्हे दाखल