Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'यासाठी मला माणसाचा बळी द्यायचा; सर्वात आधी मुलाचा देणार बळी'

‘यासाठी मला माणसाचा बळी द्यायचा; सर्वात आधी मुलाचा देणार बळी’

Subscribe

एका वेड्या बाबांनी बेगुसुराई प्रशासनाला खळबळजनक असे पत्र लिहीलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी 'मला माणसाचा बळी द्यायचा आहे, सर्वात आधी मुलाचा बळी घेणार असल्याचे लिहिण्यात आलं आहे'.

जग २१ व्या शतकात जरी वाटचाल करत असले, तरी देशातल्या काही गोष्टी अजूनही मागच्याच शतकात असल्याचं सिद्ध करत आहेत. तसेच प्रत्येक गावाप्रमाणे तिथल्या प्रथा आणि परंपरा देखील बदलत जातात असं म्हणतात. प्रत्येक गावच्या प्रथेनुसार तिथे श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा देखील जन्म होतो. अशा चालीरितींना तिथले स्थानिक लोक श्रद्धेचं नाव देतात आणि त्यालाच अंधश्रद्धा म्हणतात. श्रद्धा – अंधश्रद्धेच्या वादात अडकलेला असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिहारमध्ये सध्या व्हिडिओने आणि त्या एका पत्राने खळबळ माजवली आहे. एका व्यक्तीने बेगुसुराई प्रशासनाला पत्र पाठवून माणसाचा बळी देण्याची परवानगी मागितली आहे. तसेच सर्वात पहिला बळी मुलाचा देणार असल्याचं सांगितलं आहे.

नेमके काय घडले?

बिहारमधील एका व्यक्तीने बेगुसुराई प्रशासनाला पात्र पाठवत देवाला प्रसन्न करण्यासाठी माणसाचा बळी देण्याची परवानगी मागितली आहे. या व्यक्तीने बळी देणे गुन्हा नसल्याचं सांगत सर्वप्रथम आपण आपल्या मुलाचा बळी देणार असल्याचे पत्र लिहीले असून त्यांनी बेगुसुराई प्रशासनाची परवानगी मागितली आहे. सुरेंद्र प्रसाद सिंह असं या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तींच नाव आहे. या व्यक्तींने २९ जानेवारीला बेगुसुराईच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच सोशल मीडियावर पत्राचे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहेत. मात्र उपविभागीय अधिकारी संदीव कुमार चौधरी असं कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं सांगितलं आहे.

- Advertisement -

‘हे प्रकरणं गंभीर असून, बळी देणं बेकायदेशीर आहे. आम्ही संबंधित व्यक्तीचा शोध घेत असून, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल’, अशी माहिती देण्यात आली आहे.

हे लिहिण्यात आलं पत्रात

सुरेंद्र प्रसाद सिंह या व्यक्तीने पत्रात असं लिहिलं आहे की,’ माणसाचा बळी देणं गुन्हा नाही आहे. मला माझ्या देवानेचं असं करण्याचा हुकूम दिला आहे आणि ज्याचा मी सर्वात आधी बळी देणार आहे तो माझ्या इंजिनिअर मुलचा’. असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

वेडा बाबा

- Advertisement -

सिंह यांच्या गावातील लोकांनी त्याला ‘वेडा बाब’ म्हणून गावात ओळखलं जात असल्याचं सांगितलं आहे. तो विक्षिप्तपणे वागतो. अनेकदा निर्वस्त्र होऊन गावात फिरत असल्याचंही ते बोलले आहेत. त्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा दावा केला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी आपल्या मुलाच्या सुरक्षेची काळजीही व्यक्त केली आहे.


वाचा – शंभर तरुणी, महिलांना अंनिसने केले जटमुक्त


 

- Advertisment -