घरताज्या घडामोडीऐकावं ते नवलंच! बायको ठेंगणी, सावळी म्हणून पतीचा घटस्फोटासाठी अर्ज

ऐकावं ते नवलंच! बायको ठेंगणी, सावळी म्हणून पतीचा घटस्फोटासाठी अर्ज

Subscribe

बायको ठेंगणी, सावळी म्हणून पतीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सर्वांना वाटते की आपले वैवाहिक जीवन सुखी असावे. आपली बायको सुंदर दिसावी. उंचीने व्यवस्थित आणि गोरी असावी. स्मार्ट दिसावी. मात्र, याच गोष्टी आपल्या बायकोत नसल्यामुळे एका पतीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एक घटस्फोटाचे विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका इंजिनीयरने कोर्टात अर्ज दाखल करत घटस्फोट मिळण्याची मागणी केली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी दबाव टाकून आपल्याला त्या मुलीशी लग्न करायला लावले, असा मुलाचा आरोप आहे.

यामुळे केली घटस्फोटाची मागणी

ज्या तरुणीशी लग्न केले होते त्या तरुणीची उंची कमी असून तिचा वर्ण सावळी देखील आहे. त्यामुळे आपला जोडा ठीक दिसत नसल्याचे म्हणत या तरुणाने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

- Advertisement -

गाझियाबादमधील शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या इंजिनीयर तरुणाने कुटुंबाच्या दबाखाली पीएडीची पदवी प्राप्त केलेल्या तरुणीशी जून २०१९ मध्ये लग्न केले होते. महिलेचा पती गुरुग्राम येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असून या इंजिनीयर मुलाच्या वतीने त्याचे वकील मनोज कुमार यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्याप्रमाणे या इंजिनीयर तरुणाचे मामा मेरठ येथे राहत असून त्या मामाने आपल्या भाच्याच्या आई आणि वडिलांवर दबाव टाकून जून २०१९ मध्ये आपल्या मेव्हण्याच्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून दिले होते.

ज्यावेळी तरुणाने मुलीला पाहिले त्याचवेळी त्यांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. मात्र, कुटुंबाच्या दबावाखाली या तरुणाने त्या मुलीशी लग्न केले होते. मात्र, माझ्या व्यक्तीमत्वाशी ही मुलगी जराही जुळत नसल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. याचे कारण म्हणजे ही मुलगी खूपच ठेंगणी आहे. तसेच ती रंगाने सावळी आहे. तिला आपल्या मित्रांकडे घेऊन गेल्यांतर माझे मित्र चेष्टा मस्करी करतात, असे या तरुणाचे म्हणणे आहे. त्यामुळे मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे त्याचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तुम्हाला कर्जाचे हफ्ते भरावे लागणार का? आज Supreme Court मध्ये सुनावणी!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -