Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश धक्कादायक! कानशिलात मारण्याचा घेतला सूड! अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने हत्या

धक्कादायक! कानशिलात मारण्याचा घेतला सूड! अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने हत्या

Related Story

- Advertisement -

राजधानी दिल्लीत अल्पवयीन मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून या अल्पवयीन मुलीला कुऱ्हाडीने जिवे मारण्यात आले. या प्रकरणी २१ वर्षीय तरूणाला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आरोपीने मुलीच्या वडिलांचा सूड उगवण्यासाठी ही घटना घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी यापूर्वी मुलीचा पाठलाग करत होता. हा आरोपी आपल्या मुलीचा पाठलाग करतोय यामुळे वडिलांनी रागाच्या भरात २१ वर्षाच्या या मुलाला कानशिलात मारली. दिल्लीतील शास्त्री पार्क येथील झोपडपट्टीतील रहिवासी असलेल्या प्रदीप उर्फ ​​प्रवीण, असे आरोपीचे नाव आहे. प्रदीपला हरियाणाच्या पलवल येथील आपल्या बहिणीच्या घरातून अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिस उपायुक्त पंडित प्रताप सिंह यांनी दिली.

असा घडला प्रकार

हा २१ वर्षीय तरूण आरोपी काही महिन्यांपासून १६ वर्षाच्या मुलीता पाठलाग करीत होता आणि याची माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी त्याला रागाच्या भरात कानशिलात लगावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर प्रदीपच्या मनात राग निर्माण झाला आणि त्याने सूड घेण्याची योजना आखली.

- Advertisement -

हा खून करण्यासाठी या तरूण आरोपींनी मागील महिन्यात दिल्लीतील आर के पुरम येथून कुर्हाड खरेदी केली होती. दरम्यान, या नियोजनानुसार सोमवारी अल्पवयीन मुलीवर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती, त्यानंतर तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

- Advertisement -