Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश इम्रान खान यांच्या जवळच्या मंत्र्याची पोलिसांना बघून पळता भुई थोडी...; Video व्हायरल

इम्रान खान यांच्या जवळच्या मंत्र्याची पोलिसांना बघून पळता भुई थोडी…; Video व्हायरल

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवासांपासून राजकारणामुळे वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. इम्रान खान (Imran Khan) यांना अटक झाल्यानंतर त्यांना समर्थन करणाऱ्या लोकांनी पाकिस्तामध्ये हिंसाचारासारख्या घटना घडवून आणल्या. त्यामुळे पाकिस्तानमधील परिस्थती गंभीर असतानाच इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर मंगळवारी (16 मे) नाट्यमय वातावरण पाहायला मिळाले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचे मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhary) पोलिसांनी बघून पळता भुई थोडी झाली आहे. त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चौधरी यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे, हे दिसून येते.

फवाद चौधरी हे पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत. मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिल्यानंतर फवाद चौधरी न्यायालयाच्या परिसरातून बाहेर आले आणि आपल्या पांढऱ्या एसयूव्हीमध्ये बसून घरी जात होते. मात्र, गाडीत बसताच त्यांनी पोलिसांना पाहिले आणि घाबरून पटकन गाडीचा दरवाजा उघडून न्यायालयाच्या आत पळत सुटले. पाकिस्तानी मीडिया डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, फवाद चौधरी यांना दुसऱ्या एका प्रकरणात अटक करण्यासाठी पोलीस न्यायालया बाहेर पोहचले होते, पण त्यांनी पोलिसांना पाहताच पळ काढला.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात इम्रान खान यांना तोषखान प्रकरणात अटक झाल्यानंतर पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) समर्थकांनी हिंसाचारासारख्या घटना घडवून आणल्या होत्या. या प्रकरणात फवाद चौधरी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर जाळपोळ, हिंसक निदर्शनांना प्रोत्साहन आणि आंदोलकांना भडकवल्याचा आरोप होता. त्यांनी पाकिस्तामनध्ये हिंसाचाराची घटना नियोजनबद्धरित्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

इम्रान खान यांच्या वकीलाकडून जामीन अर्जाला विरोध
पंजाब सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने इम्रान खान यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना जामीन मंजूर करू नये अशी विनंती केली आहे. वकिलाने न्यायालयात सांगितले की, “इम्रान खान न्यायालयात हजर न होता अटक टाळण्यासाठी संरक्षक जामीन मागत आहे.” यावर, इम्रान खान यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की, इम्रान खान संरक्षणात्मक जामीन मागत आहेत, अटकपूर्व जामीन नाही. इम्रान खान याच्या वकिलाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याची विनंती केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, “माझा राजकीय छळ केला जात आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे मला अटक होण्याची भीती आहे.

दरम्यान, शुक्रवारी (12 मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अल कादिर ट्रस्ट प्रकरणी इम्रान खान यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला होता. पण त्यानंतर अटकेच्या भीतीने इम्रान खान यांनी उच्च न्यायालय परिसर सोडला नव्हता. ते शनिवारी लाहोरमधील त्यांच्या घरी परतले. दरम्यान, आयएचसीने हिंसाचार आणि देशद्रोहाशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये इम्रान खान यांना दिलेला जामीन 8 जूनपर्यंत वाढवला आहे. परंतु इम्रान खान यांना जामीन मिळाल्यानंतर पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) ही अनेक पक्षांची संघटना आहे. त्यात सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज, जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUIF) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यासह अनेक पक्षांचा समावेश आहे. या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घालत निर्देशने सुरू केली होती.

 

- Advertisment -