घरदेश-विदेशकर्नाटकातील विधानसभा परिसरात २९ जुलै ते ३० जुलै दरम्यान जमावबंदी

कर्नाटकातील विधानसभा परिसरात २९ जुलै ते ३० जुलै दरम्यान जमावबंदी

Subscribe

कर्नाटक विधानसभेत ९ जुलै रोजी येडियुरप्पा सरकारतर्फे सादर झालेल्या विश्वास मताच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभा परिसरात म्हणजेच विधान सौधा भागात २९ जुलै ते ३० जुलै (मध्यरात्र) या काळात जमावबंधी लागू करण्यात येणार आहे.

कर्नाटक विधानसभेत ९ जुलै रोजी येडियुरप्पा सरकारतर्फे सादर झालेल्या विश्वास मताच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभा परिसरात म्हणजेच विधान सौधा भागात २९ जुलै ते ३० जुलै (मध्यरात्र) या काळात जमावबंधी लागू करण्यात येणार असून ५ पेक्षा जास्त लोकांना २ किमीच्या अंतरावर एकत्र येण्यास मज्जाव केला जाणार आहे. या बदलाबाबतची माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त अलोक कुमार यांनी दिली. यापूर्वी कुमारस्वामी सरकारच्या विश्वास मत कार्यक्रमावेळीसुद्धा विधानसभा परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले होते.

कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी काल, शुक्रवारी चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी राजभवनात एका छोटेखानी कार्यक्रमात शपथ घेतली. येडियुरप्पा यांच्या शिवाय कोणीही शपथ घेतली नाही. येडियुरप्पा २९ जुलै रोजी कर्नाटक विधान सभेत राज्य सरकारतर्फे बहुमत सिद्ध करण्याचा प्रस्ताव ठेवणार आहेत.

- Advertisement -

काँग्रेस-जेडीसच्या आघाडी सरकारचा झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी काल, शुक्रवारी राज्यपाल वजुभाई वाला यांची राजभवनात भेट घेतली. तसेच सरकार स्थापनेचा दावा सादर केला. राज्यपाल वाला यांनी येडियुरप्पा यांनी सादर केलेला प्रस्ताव मान्य करत राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बी. एस. येडियुरप्पा यांना ३१ जुलैपर्यंत सभागृहात बहुमत सिद्ध करायचे आहे. २०१८ साली विधानसभा निवडणुकीतनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केली होती. मात्र बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे येडियुरप्पा यांनी काहीच दिवसात राजीनामा दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -