जम्मू काश्मीरमधून एका दहशवाद्याला अटक; फक्त 30 हजार रुपयांसाठी भारतात घुसखोरी करुन हल्ल्याचा प्रयत्न

a pakistani terrorist captured in rajouri district of jammu kashmir

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरु झाले. या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन काल चांगलेच तापताना दिसले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या गोंधळामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. यात आजच्या शेवटच्या दिवशी तरी सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जम्मू काश्मीरच्या राजौर जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सुरक्षा जवानांना हाणून पाडण्यात यश आलं आहे. नौशेरा सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून तीन दशहतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. यावेळी एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा जवानांनी जिवंत पकडले तर दोघं स्फोटात ठार झाले.

नौशेरातील झंगर सेक्टरमध्ये गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांनी 21 ऑगस्ट रोजी नियंत्रण रेषेवर 2 ते 3 दहशतवादी येत असल्याचे पाहिले. यावेळी एक दहशतवादी भारतीय चौकीच्या दिशेने येत त्याने तारेचे कुंपण कापून घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय जवानांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर भारतीय जवानांनी त्याला ताब्यात घेतले. तर त्याचे आणखी दोन घुसखोर मित्र पाकिस्तानात पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

लष्कराच्या माहितीनुसार, जखमी दहशतवाद्याला पकडण्यात आले असून तो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेला दहशतवादी त्याचे नाव तबराक हुसैन असे असून तो पाक व्याप्त काश्मीरमधील कोटली येथील सब्जकोट गावातील आहे.

चौकशीदरम्यान त्याने आपल्याला पाकिस्तान लष्करातील अधिकारी यूनुस चौधरी याने पाठवल्याचे सांगितले आहे. त्याला भारतात घुसखोरी करत हल्ल्यासाठी केवळ 25 ते 30 हजार रुपये देऊन पाठवले होते. त्याने 2 ते 3 जणांसोबत भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र ही योजना जवानांनी उलथून लावली आहे.

घुसखोर दहशतवादी हुसैन याने 2016 साली त्याचा भाऊ हारून अलीसोबत भारतात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लष्कराने त्याला मानवतेच्या आधारावर सोडून दिले. पण आता दुसऱ्यांदा दहशतवादी कारवाई करताना त्याला अटक करण्यात आली होती.


Maharashtra Monsoon Assembly Session 2022 : विधानसभेच्या कामकाजापूर्वीच्या विशेष बैठकीस सुरुवात