घरदेश-विदेश१५० फूट उंचावर पॅराग्लाईडरचा तुटला दोर, पायलटसह पर्यटकाचा मृत्यू

१५० फूट उंचावर पॅराग्लाईडरचा तुटला दोर, पायलटसह पर्यटकाचा मृत्यू

Subscribe

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

मध्यप्रदेशमधील खंडवा जिह्ल्यातील पर्यटनस्थळ हनुवंतीया येथे बुधवारी पॅराग्लाइडिंग दरम्यान भीषण अपघात झाल आहे. पॅराग्लाइडिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने दोन व्यक्तींचा उंचावरुन कोसळून मृत्यू झाला आहे. पायलटिंग करताना पावर ग्लाइडर मशीनमध्ये बिघाड झाला. अचानक मशीनमध्ये बिघाड झाल्याने पायलटसोबत असलेला प्रवासी १५० फूट उंचावरून खाली कोसळला आहे. हा अपघात मशीनमध्ये बिघाड आणि मशीन तुटल्यामुळे झाले असल्याचे तपासात समजले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी एक व्यक्ती इवेंट कंपनी सन ड्रेजर्सचा कर्मचारी आहे. तर दुसरा व्यक्ती हा कंपनीच्या कंत्राटदाराचा भाऊ आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

इंदिरा सागर धरणाच्या पाण्याच्या पाण्यात विकसित हनुवंतीयामध्ये जल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात देश-विदेशातील पर्यटक हजेरी लावत आहेत. या महोत्सवात सकाळी ९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कंपनीचे कर्मचारी पर्यटकांना पॅराग्लाईडिंगची सफर करतात. बुधवारी सायंकाळी ५ नंतर कंपनीचे कर्मचारी बाळचंद डांगी राहणार राजगड व गजपालसिंग निवासी पाली (राजस्थान) यांनी पॅराग्लाईडिंग सुरू केले. त्यात बालचंद पायलट होते आणि गजपाल खाली बसले होते.

- Advertisement -

थोड्या वेळाने १५० फूट उंचीवरून अचानक मोठा आवाज ऐकू आला. जखमी झालेल्या पक्ष्याप्रमाणे दोघेही मशीनसह खाली पडले. मशीनचे दोन तुकडे झालेआणि पॅराशूटही खाली पडले. आवाज ऐकून लोक तिथे जमले. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतक गजपाल कंत्राटदार श्रावणसिंगची काकू असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतदेहांचे पोस्टमार्टम गुरुवारी करण्यात येणार आहेत.

यामुळे झाला अपघात

- Advertisement -

अपघातामागील मुख्य कारण म्हणजे पॅराग्लाइडिंग मशीनला सतत वापरले जाणार आहे. मशीनवर विश्रांतीशिवाय सतत उड्डाण केले जात होते. दीड मिनिटांसाठी हवेत उड्डाण करण्यासाठी १६०० फी रुपये आकारली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -