Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश चंद्रावर चालता-चालता रोव्हरच्या वाटेत आला खड्डा; वाट बदलून 'प्रज्ञान' पुन्हा ध्येयाच्या दिशेने

चंद्रावर चालता-चालता रोव्हरच्या वाटेत आला खड्डा; वाट बदलून ‘प्रज्ञान’ पुन्हा ध्येयाच्या दिशेने

Subscribe

23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यशस्वी लॅंडिग करणाऱ्या विक्रम लॅंडरमधील प्रज्ञान नावाचे रोव्हर चंद्रावर रोज काही मीटर चालत असून, त्या दरम्यान त्याला मिळालेली माहिती तो इस्रोकडे पाठवित आहे.

बंगळुरू : चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यशस्वीपणे उतरलेल्या विक्रम लॅंडरमधील प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर आपला प्रवास करत आहे. या प्रवासादरम्यान त्याला मिळालेली माहिती तो भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला देत आहे. दरम्यान आज इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट रोजी ‘प्रज्ञान’ वाटेत खड्डा आल्याने त्याला वाट बदलावी लागली. सध्या प्रज्ञान सुस्थित असून, इस्रोला नवनवीन माहिती देत आहे.(A pothole came in the way of the rover walking on the moon; By changing the path ‘Pragyan’ again towards the goal)

23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यशस्वी लॅंडिग करणाऱ्या विक्रम लॅंडरमधील प्रज्ञान नावाचे रोव्हर चंद्रावर रोज काही मीटर चालत असून, त्या दरम्यान त्याला मिळालेली माहिती तो इस्रोकडे पाठवित आहे. दरम्यान 27 ऑगस्ट रोजी रोव्हरने सुरू केलेल्या प्रवासात तीन मीटर पुढे गेल्यानंतर या रोव्हरला चार मीटर व्यासाचा एक खड्डा लागला. यानंतर रोव्हरला परत फिरण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर रोव्हरने त्याची वाट बदलून पुन्हा सुरक्षितपणे आपला प्रवास सुरू केला आहे.

कालच मिळाली होती चंद्रावरील तापमानाची माहिती

- Advertisement -

विक्रम लॅंडरवर लावण्यात आलेल्या चास्टे पेलोडकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्राच्या पृष्ठभागावर 50 सेल्सीअसपर्यंत तापमान आहे. आणखी खोलवर गेल्यानंतर या तापमानामध्ये कमी होते. तर मिळालेल्या माहितीच्या आधारे 80 मिली मीटरपर्यंत आत गेल्यानंतर तापमान हे केवळ 10 सेल्सीअसपर्यंत जाते. एकुणच चंद्राचा पृष्ठभाग हा तापमान टिकून ठेवण्यास असक्षम ठरत असल्याचे दिसून येते. अशी माहिती रोव्हरने कालच दिली होती.

हेही वाचा : चंद्रानंतर आता सूर्यावर लक्ष… Aditya-L1 झेपवणार अंतराळात; ISROने जाहीर केली तारीख

- Advertisement -

 

वैज्ञानिक म्हणतात याचा अर्थ चंद्रावर पाणी आहे

27 ऑगस्ट रोजी प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाची माहिती दिल्यानंतर वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, चंद्रावर पाणी असण्याची शक्यता आहे. विक्रम लॅंडरवरील चास्टे या उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रृवावरील चंद्राच्या वरील पृष्ठभागावरील तापमानाची प्रोफाईल बनवली आहे. यामुळे चंद्रावरील तापमानाचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा : अंबानी ग्रुपचे ठरलं: Jio Air fiber लॉंच होणार गणेश चतुर्थीला; मुकेश अंबानींची घोषणा

मिळालेल्या माहितीचे विश्लेषण सुरू

इस्रोने सांगितले की, पेलोडमध्ये तापमान मोजण्याचे साधन आहे, जे पृष्ठभागाच्या खाली 10 सेमी खोलीपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे. हा आलेख चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा वेगवेगळ्या खोलीतील पृष्ठभागाच्या तपमानातील फरक दाखवतो, जसे की तपासादरम्यान नोंदवले गेले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दल अशी ही पहिलीच माहिती आहे. त्याचा सविस्तर अभ्यास अजून चालू आहे. इस्रोने जारी केलेल्या आलेखामध्ये असे दाखवले आहे की चस्टे पेलोड जसजसे खोलीकडे सरकत आहे तसतसे चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात चढ-उतार दिसत आहेत.

- Advertisment -