घरदेश-विदेशभारतीयांसाठी अभिमानाचा क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये नामांकन

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये नामांकन

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहलेल्या ‘अबंडन्स इन मिलेट्स’या गण्याला ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये स्थान मिळाले आहे. ‘अबंडन्स इन मिलेट्स’या गाण्याला ‘बेस्ट ग्लोबल म्युझिकल परफॉर्मन्स’ श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. ‘अबंडन्स इन मिलेट्स’हे गाणे फाल्गुनी शाह आणि गौरव शाह या गायकांनी गायले आहे.

यंदाचे वर्ष जगरभरात ‘इंटरनॅशनल ईयर ऑफ मिलेट्स’ म्हणून साजरे करणार आहे. यावर आधारीत पंतप्रधानांनी लिहलेले ‘अबंडन्स इन मिलेट्स’हे गाण कडधान्यांचे महत्त्व सांगत आहे. ग्रॅमी अवॉर्ड्स हे जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. यात एखाद्या नेत्याच्या गाण्याला नामांकनमध्ये स्थान मिळणे ही पहिलीच वेळ आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांनी भाजपसोबत यावं ही तर ‘दादां’ची इच्छा; अपक्ष आमदाराच्या दाव्यामुळे खळबळ

‘या’ सात गाण्यांना मिळाले स्थान

ग्रॅमी 2024 च्या ‘बेस्ट ग्लोबल म्युझिकल परफॉर्मन्सच्या श्रेणीत सात गाण्यांना नामांकन मिळाले आहे. या श्रेणीत ‘अलोन’साठी बर्ना बॉय, ‘फील’साठी डेव्हिडो, ‘मिलाग्रो वाई डिझास्टर’साठी सिल्वाना एस्ट्राडा, बेला फ्लेक,‘शॅडो फोर्सेस’साठी अरुज आफताब, विजय अय्यर आणि शेहजाद इस्माइली, एडगर मेयर आणि झाकीर हुसेन फूट, तसेच ‘पश्तो’ साठी राकेश चौरसियांना नामांकन मिळाले. या व्यतिरिक्त ‘टोडो कोलरस’या गाण्यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -