दुर्मीळ योगायोग! आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी भारताला मिळाल्या होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती

१५ वर्षांपूर्वीच प्रतिभा पाटील यांच्या रुपाने भारताला पहिल्या महिला राष्ट्रपती लाभल्या होत्या. त्यामुळे आज द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यास हा दुर्मिळ योगायोग म्हणावा लागले.

draupadi murmu and pratibha patil

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली. त्यानंतर आज २१ जुलै रोजी मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत द्रौपदी मुर्मू या पुढे असून त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा केवळ बाकी आहे. तसेच, मुर्मू राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यास त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरतील. (A rare coincidence! On this day, 15 years ago, India got its first woman President)

भारताला आज १५ वे राष्ट्रपती (15th President) मिळणार आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मतमोजणीला सकाळी ११ वाजल्यापासूनच सुरुवात झाली असून सायंकाळपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, १५ वर्षांपूर्वीच प्रतिभा पाटील यांच्या रुपाने भारताला पहिल्या महिला राष्ट्रपती लाभल्या होत्या. त्यामुळे आज द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यास हा दुर्मिळ योगायोग म्हणावा लागले.

हेही वाचा – राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालापूर्वीच द्रौपदी मुर्मूंच्या गावात मिठाईची तयारी, विजय निश्चित?

राष्ट्रपती पदासाठी मतमोजणी सुरू असतानाच दुसरी दुर्मिळ गोष्ट म्हणजे १५ वर्षांपूर्वी याच दिवशी भारताला पहिल्या महिला राष्ट्रपती लाभल्या होत्या. २१ जुलै २००७ मध्ये झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील विजयी ठरल्या होत्या. त्यानंतर २५ जुलै रोजी त्यांनी भारतातील १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी २००७ ते २०१२ या कालावधीत हे पद भुषवले.

मतमोजणीला सुरुवात

दिल्लीच्या संसद भवानात मतमोजणी सुरू झाली आहे खोली क्रमांक 63 मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी मतदान पार पडले त्याच खोलीत ही मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीसाठी सर्व राज्यांच्या विधानसभांच्या मतपेट्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान 18 जुलै रोजी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली. यात 4800 खासदार आणि आमदारांनी मिळून मतदान केले, यात द्रौपदी मुर्मू यांना 27 हून अधिक पक्षांनी पाठींबा दिला. तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षांचा पाठींबा होता. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्यास देशात पहिल्यांदाच सर्वोच्च घटनात्मक पदावर एका आदिवासी महिला विराजमान होईल. दरम्यान एकून राजकीय जाणकारांच्या मते, या निवडणुकीत मुर्मू यांना सर्वाधिक पाठींबा मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

हेही वाचा – द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा, कोण होणार भारताचे नवे राष्ट्रपती? आज निकाल होईल जाहीर

गावात जल्लोष सुरू

द्रौपदी मुर्मूंचं मूळ गाव असणाऱ्या ओडिशाच्या रायरंगपूर या गावात मठाईची तयारी केली जात आहे. विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या विरोधात द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास रायरंगपूरच्या जनतेला आहे. द्रौपदी मुर्मूंच्या गावातील लोकांनीही या निमित्ताने आदिवासी नृत्य आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी एका स्थानिक ग्रामस्थाने सांगितले की, आजचा दिवस त्यांच्या गावासाठी तसेच संपूर्ण ओडिशासाठी अभिमानास्पद आहे. आज पहिल्यांदाच एक आदिवासी महिला या देशाच्या राष्ट्रपती पदावर पोहोचणार आहे. या आनंदोत्सवानिमित्त २० हजार लाडूंचे वाटप करण्यात आले आहे. यासोबतच फटाक्यांची आतषबाजी आणि नृत्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. यासोबतच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे बॅनरही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.